हिंदीसह मराठी मनोरंजन विश्वात आता जोरदार लगीनघाई सुरु झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच नुकतीच अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्यांचे अनेक एकत्र फोटो व व्हिडीओ पाहून गेले काही दिवस त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली होती. अशातच दोघांनी सोशल मीडियावर एकत्र फोटो शेअर करत त्यांच्या नात्याविषयी सांगितले.
तितीक्ष-सिद्धार्थ लवकरच विवाहबंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नाआधीच्या म्हणजेच केळवणाला सुरुवात झाली आहे. नुकतेच अभिनेत्री अनघा अतुलने या दोघांचे केळवण साजरे केले होते. त्यानंतर आता तितीक्षा-सिद्धार्थ यांच्या आणखी एका मित्राने व भावाने दोघांचे केळवण पार पाडले आहे.
आणखी वाचा – “काळ आला होता पण…”, रश्मिका मंदानाने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे खळबळ, म्हणाली, “मरता मरता…”
सानील सावंत व अभिनेत्रीचा भाऊ साईश तावडे यांनी तितीक्षा-सिद्धार्थ यांचे केळवण साजरे केले. तितीक्षा-सिद्धार्थ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे केळवणाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये छान फुलांची सजावट करून सजवलेल्या ताटामध्ये गोड पदार्थ व मिठाई ठेवलेले पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर छान रांगोळी काढून साग्रसंगीत हे केळवण साजरे करण्यात आले.
आणखी वाचा – कुणी तरी येणार येणार गं…; वरुण धवन लवकरच होणार बाबा, सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
तितीक्षा-सिद्धार्थ हे एकमेकांचे खूप जुने मित्र आहेत. दोघेही ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेत एकत्र दिसले. त्यादरम्यान त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. गेल्या अनेक वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते आणि नुकतीच त्यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली. आता हे दोघे विवाहबंधनात कधी अडकणार? यासाठी त्यांचे अनेक चाहते आतुर आहेत.
दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तितीक्षा सध्या झी मराठी वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम करत आहे. तर सिद्धार्थ नुकताच ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात मराठीतील अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली.