‘वॉन्टेड’ तसेच ‘टार्झन द वंडर कार’ या लोकप्रिय चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे आयशा टाकिया. अभिनेत्री सध्या मनोरंजन सृष्टीपासून लांब असली तरी सोशल मीडियाद्वारे कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकतीच आयशा विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी तिने पापराझीं कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या होत्या, याचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
विमानताळावरील तिचे हे फोटो व व्हिडीओ पाहून अनेकांनी तिच्या सिनेसृष्टीतील पदार्पणावर उत्सुकता व्यक्त केली, तर काहींनी मात्र तिच्या दिसण्यावर टीका केली. “आयशाने प्लॅस्टिक सर्जरी केली, ती आता म्हातारी झाली आहे” अशा अनेक नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यामुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. ट्रोलिंग करणाऱ्या ट्रोलर्सना आता अभिनेत्रीने सडेतोड उत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने ट्रोलर्सना काही खडेबोल सुनावले आहेत.
आयशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत असे म्हटले आहे की, “दोन दिवसांपूर्वी माझ्या बहिणीच्या वैद्यकीय उपचारांसाठी मी गोव्याला गेले होते. तेव्हा विमानताळावरुन निघत असताना पापाराझींनी मला थांबवले आणि मी त्यांना काही फोटो काढू दिले. यावरून माझ्या दिसण्यावर टीका केली गेली. माझ्या दिसण्यावर टीका करण्याशिवाय या देशात इतर कोणतेही महत्त्वाचे मुद्दे नाहीत का? माझ्या व्हायरल फोटो व व्हिडीओखाली कमेंट्समध्ये अनेकांनी माझ्या दिसण्यावर हास्यास्पद टीका केली आहे. तर मी त्यांना सांगू इच्छिते की, मला चित्रपट वगैरे करण्यात अजिबातच रस नाही.”
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मी माझे जीवन आनंदाने जगत आहे, मला कोणतीही प्रसिद्धी मिळवायची गरज नाही आणि मला त्यात कोणत्याही प्रकारचा रस नाही किंवा मला आता कोणता चित्रपटही करायचा नाही. त्यामुळे कृपया शांत रहा. कृपया माझी अजिबात काळजी न घेण्यास मोकळे वाटते. एका किशोरवयीन मुलीच्या तेव्हाच्या दिसण्यात आणि १५ वर्षांनंतरच्या तिच्या दिसण्यावर प्रतिक्रिया देणे हे मला फारच हास्यास्पद वाटते. त्यामुळे कृपया सुंदर दिसणाऱ्या स्त्रिया, मुलींना पाहण्यापेक्षा चांगल्या गोष्टी शोधा आणि त्या करा. मला एक अप्रतिम जीवन लाभले आहे आणि मला तुमच्या मतांची गरज नाही. चांगला व्यक्ती बना, छंद जोपासा, जेवण करा, आपल्या मित्राशी बोला, हसा. पण एका सुंदर स्त्रीला ती कशी दिसते? हे सांगण्याइतकं वाईट वागू नका.”
आणखी वाचा – शिवजयंतीनिमित्त रितेश देशमुखची मोठी घोषणा, छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट करणार, व्हिडीओ समोर
दरम्यान, आयशाची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत असून तिच्या अनेक चाहत्यांनी व कलाकारांनी ट्रोलर्स करणऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचा साला दिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी तिने घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. अनेकांनी तिने तिचे मत जाहीरपणे मांडल्याबद्दल तिचे कौतुक केले आहे.,