रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कुणी तरी येणार येणार गं…; वरुण धवन लवकरच होणार बाबा, सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 18, 2024 | 8:33 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Bollywood actor varun dhawan Natasha dalal announced pregnancy news shared baby bump photos on social media

कुणी तरी येणार येणार गं...; वरुण धवन लवकरच होणार बाबा, सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

बॉलिवूड विश्वात सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. हिंदी मनोरंजन विश्वात कुणी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे, तर कुणाच्या घरी लहान चिमूकल्याचे आगमन होणार आहे. नुकतीच अभिनेत्री यामी गौतमच्या घरीही चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यामी प्रेग्नंट असून लवकरच ती आई होणार असल्याचे म्हटले जात आहे.  यामीच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरू असतानाच बॉलिवूड विश्वातून आणखी एक खुशखबर समोर येत आहे.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन लवकरच बाबा होणार आहे. वरुणने नुकतीच त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. वरुणने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे आणि या पोस्टद्वारे तो बाबा होणार असल्याचे जाहीर केले आहे. वरुणने नताशाबरोबरचा एक फोटो शेअर केला असून या फोटोद्वारे त्याने बाबा होणार असल्याची आनंदवार्ता सांगितली आहे.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

आणखी वाचा – “विलासरावांना जाऊन…”, स्टेजवर वाडिलांबाबत बोलताना ढसाढसा रडू लागला रितेश देशमुख, आईलाही अश्रु अनावर अन्…

वरुण धवनने नताशाबरोबरचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला असून या फोटोमध्ये तो नताशाच्या पोटाला किस करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा खास फोटो शेअर करत त्याने “आम्ही प्रेग्नंट आहोत, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे” असं म्हटलं आहे. वरुणच्या या पोस्टवर त्याच्या अनेक चाहत्यांसह बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा – “काळ आला होता पण…”, रश्मिका मंदानाने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे खळबळ, म्हणाली, “मरता मरता…”

दरम्यान, २०२१मध्ये वरुण व नताशाने एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली होती. अत्यंत शाही पद्धतीने वरुण व नताशा यांचा विवाह पार पडला होता आणि आता लग्नाच्या तीन वर्षांनंतर या दोघांनी खुशखबर दिली आहे.  

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Titeeksha Tawde and Siddharth Bokde shared special photos of Kelvan on social media

पुरणपोळी, गुलाबजाम अन्...; तितीक्षा-सिद्धार्थ यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात, 'या' खास व्यक्तीने पार पाडले केळवण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.