मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“भारतात राहायचं असेल तर बंदूक हवीच”, ऋचा चड्ढाचं धक्कादायक विधान, लेकीच्या जन्मामुळे घाबरली अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 23, 2025 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
richa chadha personal life

“भारतात राहायचं असेल तर बंदूक हवीच”, ऋचा चड्ढाचं धक्कादायक विधान, लेकीच्या जन्मामुळे घाबरली अन्...

दमदार अभिनयामधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ऋचा चड्ढा. ऋचाने तिच्या प्रत्येक भूमिकांमधून प्रेक्षकांना आपलसं केलं. गेल्याच वर्षी संजय लीला भन्साळींच्या ‘हिरामंडी’ वेबसीरिजमध्ये तिने साकारलेली भूमिका तर कमालीची होती. ऋचा सध्या मोजकंच काम करते. मात्र जे काम करते ते अगदी सिनेरसिकांना भावतं. ‘मिर्जापूर’ फेम अली फजलसह ऋचाने थाटामाटात संसार सुरु केला. आता ऋचा व अलीला गोड मुलगी आहे. ऋचा संसारामध्ये चांगलीच रमली आहे. ती प्रेग्नंसीमध्येही बरीच चर्चेत होती. मात्र आई होत असताना तिला बऱ्याच चिंता सतावत होत्या. गरोदर आहे हे लक्षात येताच आपलं आयुष्य संपलं असं तिला वाटत होतं. (richa chadha personal life)

ऋचाला गरोदर असल्याचा आनंद झालाच. पण त्याचबरोबरीने तिला बरीच चिंता होती. गरोदर राहिल्यानंतर आपलं आयुष्य काहीच उरणार नाही असं सतत तिला वाटायचं. शिवाय भारतात राहायचं असेल तर बंदूक खरेदी करायलाच हवी असंही ती म्हणाली. जगभराचे प्रश्नच ऋचाला सतावत होते. याचबाबत तिने संवाद साधला आहे. शिवाय तिला असं नक्की का वाटत होतं? हे तिने सांगितलं.

आणखी वाचा – आदित्य पारुला मंगळसूत्र घालू शकेल का?, लग्नाचं सत्य किर्लोस्कर कुटुंबासमोर येणार का?, मोठा ट्विस्ट

View this post on Instagram

A post shared by Richa Chadha (@therichachadha)

ऋचा म्हणाली, “मी थोडी घाबरलेलीच होती. सतत वातावरण बदलत असतं, अनेक लोक मारले जातात, जगभरात सगळंच काही खराब सुरु आहे. हे सगळं घडत असताना मुलाला जन्म देणं खरंच योग्य आहे का? असा प्रश्न मला पडला. तुम्ही जेव्हा स्वतःवरच अवलंबून असता तेव्हा बऱ्याच गोष्टी बदलेल्या असतात. तुम्हाला अधिक जबाबदारीने वागावं लागतं”.

आणखी वाचा – काठी, लाटण्याने मारहाण, शूटला पाठवण्यास विरोध आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्री आईचा करायची तिरस्कार, स्वतःच म्हणाली, “मुलगा हवा म्हणून…”

“सहा महिन्यांपर्यंत मुलाला जेवण उपलब्ध करुन देणं ही एक मोठी जबाबदारी असते. सुरुवातीला मला खूप भीती वाटायची. हे देवा माझं आयुष्य तर संपणार नाही ना असं सतत वाटायचं. मुलगी झाल्यानंतर असं वाटलं की, भारतात जर आपण राहत असू तर बंदूक खरेदी करायलाच हवी. पण त्यानंतर मी पुन्हा विचार केला की, आपण सगळं बघू. मुलीला तेवढं सक्षम बनवू”. ऋचा व अलीची मुलगी आता एक वर्षाची झाली आहे.

Tags: bollywood newsentertainment newsRicha Chadha
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
sharmishtha raut news updates

"माझा निर्णय चुकला म्हणून…", घटस्फोटावर शर्मिष्ठा राऊत स्पष्टचं बोलली, म्हणाली, "वैष्णवी हगवणेसारखं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.