Paaru Marathi Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. तसेच या मालिकेत नवनवीन ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेत दिशाची एंट्री झाल्याचं पाहायला मिळालं. मालिकेत एंट्री घेताच दिशाने तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. अशातच आता दिशा पारूच्या विरोधात कट रचताना देखील पाहायला मिळाली. तर दुसरीकडे आदित्य पारूशी लग्न करण्याचा निर्णय घेतो. अशातच या मालिकेत आता आणखी एक नवीन ट्विस्ट येणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीने नुकतंच या मालिकेचे दोन नवीन प्रोमो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अखेर आदित्य आणि पारूचं लग्न होताना पाहायला मिळालं.
पारू ही आदित्यच सुरक्षाकवच असते. मात्र मारुतीला जेव्हा पारू आणि आदित्यच्या नात्याविषयी कळतं तेव्हा तो याला विरोध करतो. हे सगळं संपावं म्हणून तो पारूच्या गळ्यातील मंगळसूत्रही ती झोपलेली असताना काढून घेतो. त्यामुळे आदित्यने सूर्यास्तापूर्वी पारूच्या गळ्यात मंगळसूत्र घालणं गरजेचं आहे, असा इशारा गुरुजी पारुला देतात. तर या नवीन प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की, किर्लोस्कर कुटुंब महायज्ञाच्या तयारीत मग्न असतात. त्याच वेळेला पारूला जोगतीण भेटते आणि ती पारूला तुझं मंगळसूत्र सापडणं गरजेचं आहे असं सांगते.
तर एकीकडे दिशा आदित्यला कायमच संपववण्याचा प्लॅन बनवते आणि तिच्या माणसाला आदित्यला कायमच संपवायचं आहे असं सांगते. त्यानंतर प्रीतम पारूला गुरुजी काय विचारत होते असं विचारतो. तितक्यात पारूचे वडील म्हणजेच मारुती तिथे येतो आणि प्रीतमला आदित्य आणि पारूच्या लग्नमागचं सत्य सांगतो. महायज्ञ सुरु होतं पण आदित्य तिथे नसतो. तर दुसरीकडे हे महायज्ञ सुरु असताना आदित्य पारूबरोबर लग्न करताना या प्रोमो मध्ये दाखवण्यात आलं आहे. तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून त्याने तिच्याशी पुन्हा लग्न केल्याचं पाहायला मिळालं.
आणखी वाचा – ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेतील कलाकारांना तगडं मानधन, स्मृती इराणी यांची सर्वाधिक कमाई, रक्कम तब्बल…
तर आता आदित्य सूर्यास्तापूर्वी पारूच्या गळ्यात मंगळसूत्र घालू शकेल का?, पारू-आदित्यच्या लग्नाचं सत्य अहिल्यादेवीसमोर येईल का?, किंवा याव्यतिरिक्त आणखी कोणतं रंजक वळण या मालिकेत येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.





