Rashmika mandana Takes legal action : अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांचा नुकताच विवाहसोहळा पार पडला आहे. सोशल मीडियावर सर्वत्र रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. तर आताअभिनेत्री रश्मिका पुन्हा चर्चेत आली आहे. लग्नसोहळा संपन्न झाल्यांनतर काही दिवसांनीच रश्मिकाची आई सुमन मंदाना यांचा एक खासगी ऑडिओ क्लिप लीक करण्यात आली. या ऑडिओ क्लिपमध्ये रश्मिकाची आई तिच्या मुलीच्या पहिल्या साखरपुड्याबद्दल बोलताना दिसत होती.
अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचं २०१७ साली एका कन्नड अभिनेता रक्षित शेट्टीसह सारखपुडा केला होता, परंतु त्यांचं ते नातं लग्नाधीच तुटलं होतं. व्हायरल झालेल्या त्या ऑडिओ क्लिपमध्ये रश्मिकाच्या आईने सारखपुडा तुटल्याचं कारणं सांगितली आहे. दरम्यान, अभिनेता Vijay Deverakonda याच्यासोबत रश्मिकाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आल्यानंतर हा ऑडिओ समोर आल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आलं. या क्लिपमध्ये त्यांच्या भूतकाळातील मतभेदांबद्दल उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे.
— Rashmika Mandanna (@iamRashmika) March 12, 2026
या संपूर्ण प्रकारावर रश्मिकाने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली. तिने म्हटलं की, अनेक वर्षांपासून तिच्याविरोधात चुकीची माहिती पसरवली जात आहे, तिच्या विधानांचा चुकीचं ठरवलं जातंय आणि तिने न बोललेले शब्दही तिच्या नावाने फिरवले जातात. आतापर्यंत तिने शांतता राखली, मात्र अलीकडील घटनेने मर्यादा ओलांडल्याचं तिने स्पष्ट केलं. रश्मिकाच्या म्हणण्यानुसार, सुमारे आठ वर्षांपूर्वीचं एक खासगी संभाषण संबंधितांच्या परवानगीशिवाय रेकॉर्ड करून आता मुद्दाम व्हायरल करण्यात येत आहे. यामुळे तिच्या गोपनीयतेवर गंभीर आघात झाला असून कुटुंबीयांनाही अनावश्यक वादात ओढलं जात असल्याची खंत तिने व्यक्त केली. तिने मीडिया, इन्फ्लुएन्सर्स आणि संबंधित सर्वांना हा कंटेंट तात्काळ हटवण्याचं आवाहन केलं आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही तिने दिला.
आणखी वाचा – अवघ्या 27 व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचं अकाली निधन; निधनाचे कारण अद्याप अस्पष्ट




