शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘राम’ची राजकारणात एण्ट्री, ‘रामायण’ फेम अरुण गोविल लढवणार आगामी लोकसभा निवडणूक, भाजपकडून तिकीट जाहीर

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 25, 2024 | 1:18 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Ramayana fame Arun Govil has been given ticket by BJP for the Lok Sabha elections 2024

निवडणुकीच्या रणधुमाळीत 'राम'ची राजकारणात एंट्री, ‘रामायण’ फेम अरुण गोविल लढवणार आगामी लोकसभा निवडणूक, भाजपकडून तिकीट जाहीर

लोकसभा निवडणूक २०२४ अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष येत्या निवडणुकीत जिंकण्यासाठी सक्षम मतदार उभे करत आहे. अशातच लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची पाचवी यादी जाहीर झाली आहे आणि यात रामायण माळीकतील राम म्हणजेच अभिनेते अरुण गोविल यांना निवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे.

अरुण गोविल हे मेरठमधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपनं अरुण गोविल यांना मेरठ मधील तिकिट दिलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेरठमधून सलग तीन वेळा खासदार राहिलेले राजेंद्र अग्रवाल यांचे तिकिट भाजपनं रद्द करुण ते अरुण गोविल यांना दिलं आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून अरुण गोविल यांच्या नावाची चर्चा होती.

View this post on Instagram

A post shared by Arun Govil (@siyaramkijai)

अखेर आता अरुण गोविल यांनी स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. अरुण यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर करत ही घोषणा केली आहे. अरुण गोविल यांनी या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी आभारी आहे. त्यांच्या जनतेच्या सेवेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. जय श्री राम”

आणखी वाचा – लग्नाच्या चर्चांदरम्यान कंगणा रणौतची राजकारणात एंट्री, भाजपकडून अभिनेत्रीला उमेदवारी जाहीर, ‘या’ मतदार संघातून लढवणार निवडणूक

काही वर्षांपूर्वी अभिनेते अरुण गोविल यांनी अलाहाबादमधून काँग्रेसकडून निवडणूक लढवावी अशी काँग्रेसची इच्छा होती. मात्र त्यावेळी अरुण गोविल यांनी राजकारणात येण्यास नकार दिला होता. याचा खुलासा खुद्द अरुण गोविल यांनी एका मुलाखतीत केला आहे. अशातच आता ते मेरठमधून भाजपाकडून निवडणूक लढवणार आहेत.

आणखी वाचा – ‘खेळताना रंग बाई होळीचा’, लग्नानंतर परदेशात पूजा सावंतने साजरी केली पहिली धूळवड, पती सिद्धेश चव्हाणबरोबरचे फोटो व्हायरल

दरम्यान, अरुण गोविल यांनी शेअर केलेल्या या पोस्टखाली त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काहींनी त्यांच्याअ या उमेदरवारीवर आनंददेखील व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत रामायण फेम अरुण गोविल यांची करिश्मा चालणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  

Tags: Arun Govilentertainment newsLok Sabha Election 2024Ramayana Fame
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Taapsee pannu married with boyfriend mathias boe see the details

तापसी पन्नू अडकली विवाहबंधनात, बॉयफ्रेंड मॅथियस बोबरोबर उदयपुरमध्ये बांधली लग्नगाठ, जवळच्या मित्राने शेअर केले खास फोटो

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.