गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘खेळताना रंग बाई होळीचा’, लग्नानंतर परदेशात पूजा सावंतने साजरी केली पहिली धूळवड, पती सिद्धेश चव्हाणबरोबरचे फोटो व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 25, 2024 | 11:16 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Pooja Sawant shared special photos of her first Holi after marriage

‘खेळताना रंग बाई होळीचा’, लग्नानंतर परदेशात पूजा सावंतने साजरी केली पहिली धूळवड, पती सिद्धेश चव्हाणबरोबरचे फोटो व्हायरल

संपूर्ण देशात आज धुळवडीचा सण अगदी उत्साहात व जल्लोषात साजरा होत आहे. आजच्या धुळवडीनिमित्त सर्वत्र आनंदाचं व उत्साहाचं वातावरण आहे. धुळवडीनिमित्त आज सर्वत्र अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या धुळवडीनिमित्त खास गाण्यांवर ठेका धरत सर्वचजण धूळवड साजरी करत आहेत.

अशातच ज्या जोडप्यांचं नुकतंच नवीन लग्न झालं आहे, त्यांच्यासाठी तर ही पहिली होळी खूपच खास असते आणि मराठी मनोरंजन विश्वात अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांच्यासाठी यंदाची धूळवड ही खूपच खास आहे. अशा अनेक जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत व पती सिद्धेश चव्हाण.

पूजाचा विवाहसोहळा गेल्या महिन्यात २८ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला. लग्नानंतर तिचा हा पहिला होळी सण आहे. पूजाने होळीच्या सणानिमित्त खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्रीची लग्नानंतरची ही पहिली होळी आहे. हा सण पूजा आपल्या पतीबरोबर साजरा करत आहे.

आणखी वाचा – Video : “सुमित रावांचं नाव घेते…”, होळीच्या सणानिमित्त वनिता खरातने नवऱ्यासाठी घेतला हटके उखाणा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पूजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कै खास फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिच्या पतीसह धूळवड साजरी करताना दिसत आहे. पूजाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पूजाच्या व सिद्धेशच्या नवऱ्याच्या चेहऱ्याला रंग लागलेले पाहायला मिळत आहेत. पूजाचा नवरा सिद्धेशनेही दोघांचे होळीचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यावर अनेकांनी त्यांना होळीनिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.  

आणखी वाचा – Video : धुळवडीच्या रंगात रंगले ऐश्वर्या व अविनाश नारकर, होळीच्या खास गाण्यावर ठेकाही धरला अन्… व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, लग्नानंतर पूजा आणि सिद्धेश हनिमूनसाठी विदेशात गेले होते. नवऱ्याबरोबर बीचवरची धम्माल पूजानं चाहत्यांबरोबर शेअर केली होती. तिच्या त्या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. अशातच तिने तिच्या पहिल्या होळीनिमित्त शेअर केलेल्या खास फोटोलादेखील चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी त्यांना होळी व धुळवडीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.   

Tags: marathi actressmarathi entertainment newspooja sawant
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Kangana Ranaut has been announced by the BJP as a candidate for the upcoming Lok Sabha elections 2024

लग्नाच्या चर्चांदरम्यान कंगणा रणौतची राजकारणात एण्ट्री, भाजपकडून अभिनेत्रीला उमेदवारी जाहीर, ‘या’ मतदार संघातून लढवणार निवडणूक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.