रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या चर्चांदरम्यान कंगणा रणौतची राजकारणात एण्ट्री, भाजपकडून अभिनेत्रीला उमेदवारी जाहीर, ‘या’ मतदार संघातून लढवणार निवडणूक

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 25, 2024 | 12:14 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Kangana Ranaut has been announced by the BJP as a candidate for the upcoming Lok Sabha elections 2024

लग्नाच्या चर्चांदरम्यान कंगणा रणौतची राजकारणात एंट्री, भाजपकडून अभिनेत्रीला उमेदवारी जाहीर, ‘या’ मतदार संघातून लढवणार निवडणूक

लोकसभा निवडणुका या अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष आगामी निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करत आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची पाचवी यादी जाहीर झाली आहे. या यादीत एक लोकप्रिय व अपेक्षित नाव समोर आले आहे आणि हे लोकप्रिय नाव म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत. अभिनेत्री कंगणाला लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली असून भाजपकडून तिला तिकीट देण्यात आलं आहे.

हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून कंगना लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. कंगनाच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे ती फार चर्चेत असते. त्यामुळे तिला भाजपमधून तिकीट मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं. अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला असून कंगना हिमाचल प्रदेशातून तिकीट देण्यात आलं आहे.  भाजपाने कंगनाला तिकिट दिल्यानंतर कंगनाची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

My beloved Bharat and Bhartiya Janta’s own party, Bharatiya Janta party ( BJP) has always had my unconditional support, today the national leadership of BJP has announced me as their Loksabha candidate from my birth place Himachal Pradesh, Mandi (constituency) I abide by the high…

— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 24, 2024

आणखी वाचा – ‘खेळताना रंग बाई होळीचा’, लग्नानंतर परदेशात पूजा सावंतने साजरी केली पहिली धूळवड, पती सिद्धेश चव्हाणबरोबरचे फोटो व्हायरल

कंगणाने एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर तिची प्रतिक्रिया देत असं म्हटलं आहे की, “माझा प्रिय भारत आणि भारतीय जनता पक्षाचा (भाजप) मला नेहमीच बिनशर्त पाठिंबा मिळाला आहे. आज भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मला माझ्या जन्मभूमी हिमाचल प्रदेश, मंडी (मतदारसंघ) येथून त्यांचा लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. हा माझ्यासाठी मोठा बहुमान आहे. मला आपल्या पक्षात अधिकृतपणे सामील केल्याबद्दल मला आनंद झाला आहे आणि हा मी माझा सन्मान समजते.

आणखी वाचा – Video : धुळवडीच्या रंगात रंगले ऐश्वर्या व अविनाश नारकर, होळीच्या खास गाण्यावर ठेकाही धरला अन्… व्हिडीओ व्हायरल

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मी एक योग्य कार्यकर्ता आणि एक विश्वासार्ह लोकसेवक होण्यासाठी उत्सुक आहे.” दरम्यान, आपल्या अभिनयाने रुपेरी पडदा गाजवणारी ही कंगणा रणौत आता लोकसभेच्या रिंगणातून जनतेच्या मनात पोहचणार का? आणि जनता तिला काय कौल देणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी कंगणासह तिचे अनेक चाहतेही चांगलेच उत्सुक आहेत हे नक्की.

Tags: bollywood actressBollywood entertainment newskangana ranautLok Sabha Election 2024
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Ramayana fame Arun Govil has been given ticket by BJP for the Lok Sabha elections 2024

निवडणुकीच्या रणधुमाळीत 'राम'ची राजकारणात एण्ट्री, ‘रामायण’ फेम अरुण गोविल लढवणार आगामी लोकसभा निवडणूक, भाजपकडून तिकीट जाहीर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.