दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत सध्या ‘जेलर’ चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. जो काही दिवसांपूर्वी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. अशातच रजनीकांत नुकतेच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडले होते. मात्र, यांमुळे रजनीकांत जोरदार ट्रोल झाले होते. आता रजनीकांत यांनी यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. (Rajinikanth on Yogi Adityanath Meeting)
अभिनेते रजनीकांत त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे त्यांनी विविध नेत्यांची भेट घेतली होती. शनिवारी लखनौमध्ये रजनीकांत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती, त्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी रजनीकांतचे स्वागत केले होते. स्वागतानंतर त्यांनी योगी आदित्यनाथ यांचा पाया पडल्या होत्या.
या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी रजनीकांत यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे. दोघांमधील वयाचे अंतर पाहता रजनीकांत यांनी हे असे कृत्य करायला नव्हते पाहिजे, असे नेटकरी म्हणत आहे. आता या प्रकरणावर रजनीकांत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
हे देखील वाचा – “माझे न्यूड व्हिडीओ काढले, ड्रग्ज दिलं अन्…”, पूर्वाश्रमीचा पती आदिलचे राखी सावंतवर गंभीर आरोप, म्हणाला, “कोट्यवधी रुपये तिने…”
#WATCH | Actor Rajinikanth meets Uttar Pradesh CM Yogi Adityanath at his residence in Lucknow pic.twitter.com/KOWEyBxHVO
— ANI (@ANI) August 19, 2023
उत्तर प्रदेशचा दौऱ्यावरून परतताना रजनीकांत चेन्नई विमानतळावर दिसले. यावेळी पत्रकारांशी बोलताना रजनीकांत यांनी सांगतिले की, “हो, ही माझी एक सवय आहे. साधू असो वा योगी, त्यांच्या चरणांना स्पर्श करण्याची माझी सवय आहे. अगदी समोरचा माणूस माझ्यापेक्षा वयाने लहान असला तरी. मी तेच केले.” (Rajinikanth clarifies after feet touching of UP CM Yogi Adityanath)
हे देखील वाचा – ५६ कोटींचं कर्ज आणि घराचा लिलाव होणार असल्याच्या चर्चांवर अखेर सनी देओलने सोडलं मौन, म्हणाला, “या प्रकरणावर…”
अभिनेते रजनीकांतच्या ‘जेलर’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपटाने देश-विदेशात आतापर्यंत तब्बल ५५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. नेल्सन दिग्दर्शित या चित्रपटात रजनीकांतसह अनेक बडे कलाकार दिसले असून या चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.