बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभिनेते, दिग्दर्शक क्षितिज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 5, 2024 | 1:16 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kshitij Zarapkar Death

अभिनेते, दिग्दर्शक क्षितिज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

मराठी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेते, दिग्दर्शक, लेखक क्षितिज झारापकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ५४व्या वर्षी क्षितिज यांनी जगाचा निरोप घेतला. आज सकाळी १०च्या सुमारास त्यांनी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी दीड ते दोन वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थिव दादर शिवाजी पार्क येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यांनतर लगेचच ३.३०च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. (Kshitij Zarapkar Death)

मागील अनेक महिन्यांपासून क्षितिज यांची आजाराशी सुरु असलेली लढाई आज अयशस्वी ठरली. मल्टिपल ऑर्गन डिसऑर्डर झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तसेच मिळालेल्या माहितीनुसार क्षितिज यांचे कर्करोगामुळे निधन झाल्याचे समोर आले आहे. ‘गोळा बेरीज’, ‘एकुलती एक’, ‘आयडियाची कल्पना’ यांसारख्या चित्रपटांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. अभिनेता म्हणूनच नव्हेतर अनेक चित्रपट व नाटक यांच्या दिग्दर्शन व लेखनातूनही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

आणखी वाचा – अयोध्येत पोहोचलं ओक कुटुंब, प्रसादने पत्नी, मुलांसह रामलल्लाचं घेतलं दर्शन, मराठमोळ्या पेहरावातील फोटोही केले शेअर

तसेच आस्ताद काळे व अदिती सारंगधरच्या चर्चा तर होणारच या नाटकातूनही ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. क्षितिज यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.अनेक दिवसांपासून ते आजाराशी लढत रुग्णालयात उपचार घेत होते, अशी माहितीही समोर आली आहे.

Tags: Kshitij ZarapkarKshitij Zarapkar DeathKshitij Zarapkar passed awaymarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Rakhi Savant Weird Behaviour

आधी हात धरत ढकललं आणि मग…; राखी सावंतने चाहतीला दिलेली वागणूक पाहून नेटकरी भडकले, म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.