बॉलीवूड अभिनेता सनी देओल काही दिवसांपूर्वी ‘गदर २’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आला होता. अशातच तो आता एका वेगळ्या कारणाने पुन्हा चर्चेत आला आहे. सनी देओलच्या जुहूमधील बंगल्याच्या लिलावासाठी नोटीस बजावण्यात आली होती. सनीने बँक ऑफ बडोदाकडून ५६ कोटींचे कर्ज घेतले होते. त्यासाठी त्याने जुहूतील बांगला गहाण म्हणून ठेवला होता. पण, त्याने त्या कर्जाची संपूर्ण रक्कम अद्याप भरलेली नसल्याने बँकेकडून हा बंगला लिलावात काढण्यात आला होता. तशी जाहिरात त्यांनी एका वृत्तपत्रात दिली होती. पण, काही तासांतच बँकेने हा लिलाव तांत्रिक कारण देत रद्द केला. शिवाय, ती नोटीसदेखील मागे घेतली आहे. (Sunny Deol House Auction)
या प्रकरणाची चर्चा व राजकारण सुरु असतानाच सनी देओलने यावर आपले मौन सोडलं आहे. अभिनेत्याने एक निवेदन जाहीर केलं आहे. ज्यात त्याने म्हटलंय की, आम्ही हा मुद्दा सोडवण्याच्या प्रक्रियेत असून ही समस्या लवकरच सोडवण्यात येईल. तसेच या प्रकरणावर जास्त भाष्य करणे टाळावे, अशी विनंती त्याने केली आहे.
हे देखील वाचा – देशाला अभिमान असताना प्रकाश राज यांनी चांद्रयान मोहिमेची उडवली खिल्ली, के सिवन यांचा ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले…
एकीकडे सनी देओलच्या घराचा लिलाव होत असताना बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार सनीच्या मदतीसाठी आल्याचे वृत्त समोर येऊ लागल्या होत्या. माध्यमांच्या माहितीनुसार, अक्षय कुमार सनी देओलचे कर्ज फेडण्यासाठी मदत करणार आहे. मात्र, अक्षय कुमारच्या प्रवक्त्यांनी हा दावा फेटाळला असून हे सगळं खोटं असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
हे देखील वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने नवऱ्याला लग्नापूर्वी घातली ‘ती’ अट, खुलासा करत म्हणाली, “तो माझ्यासाठी गिरगावचं घर सोडून आला आणि…”
दरम्यान, अभिनेता सनी देओलच्या ‘गदर २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. समोर आलेल्या आकड्यांनुसार, चित्रपटाने आतापर्यंत ३९० कोटी रुपयांची कमाई केली आहे. लवकरच चित्रपट ४०० कोटींचा आकडा गाठणार असल्याचे बोलले जात आहे. २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. ज्यात सनी देओलसह अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत झळकले आहेत. (Sunny Deol House Auction)