प्रसिद्ध गायक राहुल वैद्य व दिशा परमार हे दोघे सध्या त्यांची लाडकी लेक ‘नव्या’सह खुश असलेले पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी २० सप्टेंबर रोजी दिशाने आपल्या मुलीला जन्म दिला. तेव्हपासून राहुल व दिशा यांनी आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा दाखवलेला नव्हता. त्यामुळे त्यांच्या अनेक चाहत्यांना नव्याला पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती. अशातच राहुल व दिशा यांनी त्यांच्या चाहत्यांना नव्याची खास झलक दाखवली आहे.
काही दिवसांपूर्वी राहुल व दिशा यांनी मुंबई विमानतळावर पापाराझींना आपल्या मुलीची ओळख करून दिली होती. यावेळी पापाराझींनीही नव्याचे काही खास फोटो त्यांच्या कॅमेऱ्यात टिपत होते. यावेळी नव्या अगदी राहुलसारखी दिसत असल्याच्या अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर आल्या होत्या.
अशातच आता राहुल व दिशा यांनी सोशल मीडियावर पहिल्यांदाच जाहीररित्या नव्याचा चेहरा दाखवला आहे. राहुल व दिशा यांनी लेकीसह एक गोड सेल्फी काढला आहे. ‘माझं जग’ असं कॅप्शन देत राहुल व दिशा यांनी लेकीसह त्यांचे खास फोटो शेअर केले आहेत. राहुल-दिशा यांनी शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये दिशा राहुलला व राहुल नव्याला किस करत आहे.
राहुल व दिशा यांनी शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी नव्याच्या निरागसतेचे कौतुक केले आहे. खूप छान, किती गोड, अगदी सुंदर फोटो” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी या फोटोंणा चांगलीच पसंती दर्शवली आहे.
दरम्यान, ४ महिन्यांनंतर राहुल-दिशा यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचा चेहरा सर्वांना दाखवला आहे. कित्येक दिवस चाहत्यांना नव्याचा चेहरा पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती. शेवटी राहुल व दिशा यांनी लेकीचा चेहरा दाखवला असल्याने चाहत्यांमध्ये आनंदच वातावरण पाहायला मिळत आहे.