आपल्या मनमोहक सौंदर्याने व निरागस अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. ‘मन धागा धागा जोडते नवा’ असं म्हणत तिने मराठीसह हिंदी प्रेक्षकांशी आपली नाळ जोडली. काही दिवसांपूर्वी पूजाने सोशल मीडियावर सिद्धेशबरोबरचे खास फोटो शेअर केल. या फोटोसह “एका खास व्यक्तीसह मी माझ्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाला सुरुवात करत आहे” असं म्हणत तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.
पूजाने बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाणबरोबर चेहरा न दाखवता काही फोटो शेअर केले होते. तेव्हापासूनच पूजाच्या आयुष्यातील हा खास व्यक्ती कोण आहे? याची सर्वांना उत्सुकता लागली होती. त्यानंतर काही दिवसांनी पूजाने तिची अंगठी फ्लॉन्ट करत सिद्धेशबरोबरचे फोटो शेअर केले व तिच्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली.
अशातच नुकताच पूजा-सिद्धेशचा भव्य साखरपुडा सोहळा पार पडला. साखरपुडा सोहळ्यासाठी अभिनेत्रीने हिरवी पैठणी साडी, नाकात नथ असा पारंपरिक लूक केला होता. तर, सिद्धेशने सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केला होता. पूजा व सिद्धेश दोघेही या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत होते. अशातच पूजाने तिच्या या साखरपुडा सोहळ्याचा खास व्हिडीओही शेअर केला आहे. यात पूजाच्या संपूर्ण साखरपुडा सोहळ्याची झलक पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये पूजा सिद्धेशला असं म्हणते की, “मिस्टर सिद्धेश चव्हाण, जेव्हा कुठे प्रेमावरचा विश्वास उडून गेला होता. मला कधीच वाटलं नव्हतं, मी कुणावर कधी इतकं प्रेम करु शकते. पण तुझ्या येण्याने माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. जर तू विचारलं नसतं, तर कदाचित मीच तुला विचारलं असतं. पण आज देव व आपल्या सर्व कुटुंबीयांसमक्ष मी तुला विचारत आहे, माझ्याशी लग्न करशील?” यानंतर सिद्धेश तिच्या हाताला व कपाळाला किसही करतो.
आणखी वाचा – शिवजयंतीनिमित्त रितेश देशमुखची मोठी घोषणा, छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट करणार, व्हिडीओ समोर
पूजाच्या या साखरपुड्याला अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, भूषण प्रधान, वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी, गौरी महाजनी, श्रेयस सावंत, रुचिरा सावंत, सौमिल शृंगारपुरे, फुलवा खामकर यासंह अनेक कलाकारांनी हजेरी लावल होती. पूजाच्या साखरपुड्यात मित्रांनी केलेली धमाल, मजामस्तीही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
पूजाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याचबरोबर अनेकांनी पूजाला अभिनंदन म्हणत साखरपुड्यानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. तर अनेकांनी अभिनेत्रींच्या लुकचे कौतुकही केले आहे.