शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“काही दिवस तब्येत ठिक नसल्यामुळे…”, लग्नानंतरच्या पहिल्याच मुलाखतीत अमृता देशमुख व प्रसाद जवादेचं भाष्य, म्हणाली, “नवरा-बायको म्हणून…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 5, 2023 | 3:56 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
prasad khandekar namrata sambherao ekda yeun tar bagha marathi movie prasad jawade amruta deshmukh interview after marriage watch video

"काही दिवस तब्येत ठिक नसल्यामुळे...", लग्नानंतरच्या पहिल्याच मुलाखतीत अमृता देशमुख व प्रसाद जवादेचं भाष्य, म्हणाली, "नवरा-बायको म्हणून..."

सध्या सर्वत्र ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. प्रसाद खांडेकरने लिहलेला व दिग्दर्शित केलेला हा त्याचा पहिलाच चित्रपट असून यात सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, पंढरीनाथ कांबळे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने, राजेंद्र शिसतकर, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार आदि कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या ८ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून नुकताच या चित्रपटाचा प्रिमियर सोहळा पार पडला. या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यात प्रसाद जवादे व अमृता देशमुख ही जोडीदेखील या प्रिमियरला उपस्थित होती.  (Prasad Jawade And Amruta Deshmukh Interview)

यावेळी ‘इट्स मज्जा’बरोबर या जोडीने संवाद साधला. तेव्हा प्रसाद-अमृताची लग्नानंतरची ही पहिलीच ‘मुव्ही डेट’ असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अमृता “या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही लग्नानंतर पाहिल्यांदाच डेटवर आलो आहोत. त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. प्रसादला नेहमीच मला डेटवर घेऊन जायला आवडतं. मात्र मीच कंटाळा करते. आणि त्यात गेले काही दिवस माझी तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही कुठे बाहेर गेलो नव्हतो. अशातच या चित्रपटाच्या निमित्ताने बाहेर पडता आलं. त्यामुळे मी खूप आनंदी आहे.” असं तिने म्हटलं.  

आणखी वाचा – Video : प्रसाद खांडेकर बोलत असताना कॅमेऱ्यासमोरच गौरव मोरेला अश्रू अनावर, अभिनेता रडला अन्…; म्हणाला, “कोणतंही काम असं तरीही…”

यापुढे प्रसाद-अमृता हे एकत्र मोठ्या पडद्यावर कधी दिसणार? या प्रश्नाचे उत्तर देताना ती असं म्हणाली की, “आम्ही दोघांनी एकत्र मोठ्या पडदयावर काम करावी अशी माझीही इच्छा आहे. नवरा-बायको म्हणून नाहीतर कलाकार म्हणून एकत्र काम करण्यासाठी आम्ही दोघेही उत्सुक आहोत. एखाद्या नवीन प्रोजेक्टमध्ये आम्ही दोघे एकत्र काम करण्यासाठी आम्ही कायमचं आतुर आहोत आणि मला आशा आहे की, लवकरच आम्ही एकत्र मोठ्या पडद्यावर दिसू.” 

आणखी वाचा – बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याची कर्करोगाशी झुंज, शेवटचे फक्त ४० दिवस उरले?, सचिन पिळगांवकरांना भेटण्याची इच्छा आहे अन्…

दरम्यान, या प्रिमियर सोहळ्याला जॉनी लिवर यांनीदेखील हजेरी लावली होती. त्याचबरोबर समीर चौघुले, निखिल बने, गौरव मोरे, शिवाली परब, वनिता खरात, ईशा डे, प्रियदर्शिनी इंदलकर, प्रसाद ओक यांसह सचिन मोटे व सचिन गोस्वामी अशा हास्यजत्रेतील सर्व कलाकार प्रसादला शुभेच्छा देण्यासाठी आले होते.  त्याचबरोबर प्रसाद खांडेकर व नम्रता संभेराव यांचे कुटुंबियही या सोहळ्याला उपस्थित होते. 

Tags: amruta deshmukhekda yeun tar baghaentertainment newsmarathi entertainmentmarathi movieMarathi newsnamrata sambheraoprasad jawadeprasad khandekar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
ekda yeun tar bagha marathi movie main lead namrata sambherao and her family gets emotional after premiere watch video

Video : सूनेचा चित्रपट पाहून सासूबाई भावुक, नम्रता संभेरावही सगळ्यांसमोर रडू लागली, म्हणाली, "हा क्षण माझ्यासाठी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.