सध्या सर्वत्र आयपीएलची क्रेज सुरु असलेली पाहायला मिळत आहे. बरेचसे आयपीएल प्रेमी हे स्टेडिअममध्ये जाऊन क्रिकेटचा आनंद लुटताना दिसत आहेत. तर काही मंडळी ही घरच्या घरीच आयपीएलचा आनंद घेत आहेत. या क्रिकेटप्रेमींमध्ये आता कलाकार मंडळीही सहभागी झाली आहेत. यंदाच्या आयपीएलला अनेक कलाकार मंडळींनी स्टेडिअममध्ये जात क्रिकेटचा आनंद लुटला, याचे अनेक फोटो, व्हिडीओ त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केलेले पाहायला मिळाले. अशातच एका मराठमोळ्या कलाकार कुटुंबाचा आयपीएलचा आनंद लुटतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Pravin Tarde Family Time)
अशातच आता एका मराठमोळ्या कलाकाराने सहकुटुंब आयपीएलचा आनंद लुटला आहे. तरडे कुटुंब सध्या सुट्ट्यांमध्ये एकत्र वेळ घालवताना दिसत आहे. प्रविण तरडे व त्यांची पत्नी स्नेहल तरडे सध्या त्यांच्या कुटुंबासह एन्जॉय करताना दिसत आहेत. प्रविण व स्नेहल त्यांच्या लेकाबरोबर घरातल्या घरात वेळ घालवतानाचा व्हिडीओ स्नेहलने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तरडे कुटुंब एकत्र खूप आनंदात दिसत आहे.
स्नेहलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रविण व त्यांचा लेक आयपीएलचा आनंद लुटताना दिसत आहे. यावेळी स्नेहलने खास त्यांच्यासाठी पॉपकॉर्न व ज्यूसचा बेत केलेला दिसला. त्यानंतर तिघेही एकत्र बसून आयपीएल बघताना दिसले. या व्हिडीओमध्ये प्रविण तरडे यांच्या घरची झलक पाहायला मिळत आहे. भल्या मोठ्या घराचा हॉल, सुटसुटीत किचन पाहणं रंजक ठरतंय. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करत, “जमिनीवर पाय असणारी माणसं. तुमच्या सिनेमातूनच नाही तर आयुष्यातून पण खूप शिकण्यासारखे आहे”, असं म्हणत त्यांच्या कुटुंबाचं कौतुक केलं.
अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार अशी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवीण तरडे यांची ओळख आहे. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामुळे प्रविण तरडे चर्चेत आले. तसेच ‘देऊळ बंद’ या सिनेमाचं दिग्दर्शनही तरडेंनी केलं होतं. प्रवीण तरडेंनी ‘कन्यादान’, ‘कुंकू’, ‘कुटुंब’, ‘तुझं माझं जमेना’, ‘पिंजरा’ या मालिकांचं लेखन केलं आहे.