मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रुपालीमुळे कुटुंबातील आणखी एका सदस्याचा बळी?, देवी आईच्या लेकी राजाध्यक्ष कुटुंबाला वाचवू शकतील का? ‘सातव्या मुलीची…’मध्ये नवा ट्विस्ट

Saurabh Moreby Saurabh More
मे 6, 2024 | 10:52 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi zee marathi serial update new twist

रुपालीमुळे कुटुंबातील आणखी एका सदस्याचा बळी?, देवी आईच्या लेकी राजाध्यक्ष कुटुंबाला वाचवू शकतील का? ‘सातव्या मुलीची...’मध्ये नवा ट्विस्ट

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत एकामागून एक नवनवीन ट्विस्ट हे येतच असतात. त्यामुळे मालिकेत येणारा प्रत्येक नवीन ट्विस्ट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. मालिकेतील हे नवनवीन ट्विस्ट पाहण्याची प्रेक्षकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. अनेक उत्कंठावर्धक व रहस्यमय कथानकाने या लोकप्रिय मालिकेने सर्वांची मनं जिंकली आहेत. मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट हीच या मालिकेची जमेची बाजू आहे.

मालिकेत नुकतंच रुपालीने घरातील सदस्यांना तिला विरोचकाच्या शक्तीने संमोहित केल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेत रुपालीने फाल्गुनी व केतकी काकूलं संमोहित केले आहे. रुपालीने त्या दोघींना घरातील इतर कोणत्याही व्यक्तीचे काहीच ऐकायचे नाही असं सांगितले असून तिने नुकतंच पोलिसांना बोलावले असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे घरात पोलिस येतात आणि मग रुपाली राजाध्यक्ष कुटुंबीय घरातील व्यक्तींचा छळ होत असल्याचं म्हणते. यानंतर पोलिस घरी येताच रुपाली त्या पोलिसांनादेखील संमोहित करते.

View this post on Instagram

A post shared by सातव्या मुलीची सातवी मुलगी (@saatvyamulichisaatvimulgioffic)

 

आणखी वाचा – चैतन्यने पुन्हा केला अर्जुनचा विश्वासघात, तर प्रियाने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर आणलं, सायलीने प्रेमाची कबुली देत डाव पलटला अन्…

अशातच आता मालिकेचा नुकताच नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यामध्ये रुपाली फ्रीजमध्ये बसलेली असताना शेखर तिला पाहून दचकतो आणि रुपाली त्याच्या डोळ्यांत पाहून त्यालाही संमोहित करते. अशातच आता नवीन प्रोमोमध्ये नेत्रा रुपालीच्या खोलीचा दरवाजा थोठावताना दिसत आहे. तर रुपाली धारदार शस्त्राने कुणाचा तरी बळी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रुपाली दरवाजा उघडताच तिच्या हातातील शस्त्राला रक्त लागलेले पाहून नेत्रालाही धक्का बसतो.

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमला प्रसाद खांडेकरने दिली बर्थडे पार्टी, सेटवरच लावला पाणीपुरीचा स्टॉल, खायला गर्दी अन्…

त्यामुळे मालिकेत आता कुणाचा बळी गेला आहे. रुपालीने कुणाचा जीव घेतला आहे? हे येणाऱ्या भागांत पाहायला मिळणार आहे. रुपालीने वशीकरण करुन घेतलेल्या बळीमुळे मालिकेच्या कथानकाला आणखी एक नवीन वळण आले आहे. त्यामुळे आगामी भागात आणखी नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. यासाठी मालिकेचे प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.  

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Deepali Sayed On Trolling

"मी मुसलमान व्यक्तीशी लग्न केलं म्हणून…", स्वतःच्या नावावरुन दीपाली सय्यदचे स्पष्ट मत, म्हणाली, "इतकं सोप्पं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.