सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी मुसलमान व्यक्तीशी लग्न केलं म्हणून…”, स्वतःच्या नावावरुन दीपाली सय्यदचे स्पष्ट मत, म्हणाली, “इतकं सोप्पं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 6, 2024 | 11:04 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Deepali Sayed On Trolling

"मी मुसलमान व्यक्तीशी लग्न केलं म्हणून...", स्वतःच्या नावावरुन दीपाली सय्यदचे स्पष्ट मत, म्हणाली, "इतकं सोप्पं..."

कलाकार मंडळी म्हटलं की ट्रोलिंग हे आलंच. बरीचशी कलाकार मंडळी अशी आहेत जी ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. तर काही कलाकार मंडळी या ट्रोलिंगकडे लक्ष देत नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने या ट्रोलिंगवर व राजकारणावर आपलं मत स्पष्ट केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे दीपाली सय्यद. दीपाली सय्यदने आजवर तिच्या अभिनयशैलीने गेली २५ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अभिनयसृष्टीप्रमाणेच दीपाली राजकारणातही सक्रिय असते. राजकारण व अभिनय या दोन्ही क्षेत्रात काम करत असताना अभिनेत्रीला बरेचदा ट्रोलिंगला समोर जावं लागलं. (Deepali Sayed On Trolling)

नुकतीच अभिनेत्रीने ‘इट्स मज्जा’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे व व्यासायिक आयुष्यामुळे नेटकऱ्यांनी केलेल्या ट्रोलिंग बद्दल सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, “ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करायचं. आपण ट्रोल होत आहोत म्हणजे हिट आहोत. मी ट्रोलिंगला सकारात्मक दृष्टिकोनातून बघते. ट्रोल झाल्यावर खूप मजबूत व्हावं लागणार आहे. हृदयाला इतकं निगरगट्ट बनवायला लागणार आहे, दगड बनवावं लागणार आहे. पण आता मी ट्रोलर्सकडे लक्षच देत नाही. जितके तुम्ही त्या कमेंट वाचणार तेवढं तुम्हाला त्रास होणार. काही काही तर माणसं त्यासाठीच बसवलेली असतात, ट्रोलिंग करण्यासाठी. ट्रोलर काय आहेत, त्यांना काही काम नाही”.

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमला प्रसाद खांडेकरने दिली बर्थडे पार्टी, सेटवरच लावला पाणीपुरीचा स्टॉल, खायला गर्दी अन्…

“आजकाल गरीब आणि श्रीमंत दोघांकडेही मोबाईल आहे. सगळ्यांकडे काही नसेल तरी चालेल पण मोबाईल आहे. प्रत्येकाचं डोकं ज्या पद्धतीने चालतं त्या पद्धतीने ते टाइप करतात. त्यांच्याकडे मी आता लक्ष देत नाही. कलाकार हा खूप भावनिक असतो. आणि तो जेव्हा उतरतो ना तेव्हा व सच्चाईने उतरतो. त्याला जे काही करायच त्यासाठीच उतरतो. मला सुरुवातीला काहीच इंटरेस्ट नव्हता. पण आपचं तिकीट आलं. सगळ्यांनी सांगितलं तुझ्यात ते गुण आहेत, तू करू शकते, तू कर. एकदम शेवटच्या क्षणाला मी हो म्हटलं. आणि बाप रे बाप, तेव्हा पहिल्यांदा मी ट्रोलिंगला सामोरी गेले”.

आणखी वाचा – चैतन्यने पुन्हा केला अर्जुनचा विश्वासघात, तर प्रियाने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर आणलं, सायलीने प्रेमाची कबुली देत डाव पलटला अन्…

पुढे ती म्हणाली, “आज मी जेवढं सांगत आहे ना की ट्रोलकडे लक्ष देऊ नका तेव्हा मी लक्ष दिलं होतं. आणि तेव्हा मी भर पत्रकार परिषदेत रडले होते. कारण इतकं ट्रोलिंग झालं होतं. एकतर माझ्या नावाला घेऊन ट्रोलिंग झालं होतं, मी मुसलमान व्यक्तीशी लग्न केलं म्हणून ट्रोलिंग झालं होतं. त्या गोष्टीवरून मला कळलं राजकारण इतकं सोपं नाही आहे, आपल्याला खूप स्ट्रॉंग व्हावं लागणार आहे”.

Tags: Deepali Sayed On Trollingdeepali sayyadentertainmentmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Mukta Barve shared special post on social media in memory of India and naach ga ghuma movie

“सध्या मी भारतात नाही पण...’, परदेशात असलेल्या मुक्ता बर्वेला करमेना, भावुक होत म्हणाली, “पहिल्यांदाच असं झालं असेल…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.