मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पहिल्यांदा ते भेटले आणि…”, अशोक सराफांच्या भेटीनंतर समीर परांजपेची भावुक पोस्ट, म्हणाला, “ते मला ओळखतात याचं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 4, 2023 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sameer Paranjape On Ashok Saraf

"पहिल्यांदा ते भेटले आणि…", अशोक सराफांच्या भेटीनंतर समीर परांजपेची भावुक पोस्ट, म्हणाला, "ते मला ओळखतात याचं…"

मराठी सिनेसृष्टीतील एक काळ गाजवणारे अभिनेते अशोक सराफ यांचे लाखो चाहते आहेत. या महान अभिनेत्याला एकदा तरी पाहावं, भेटावं असा प्रत्येक कलाकाराचा ग्रह असतो. ही कलाकार मंडळी अशोक मामांना भेटायला नेहमीच उत्सुक असतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्याची अशोक मामांसह भेट झाली. यादरम्यान त्याला झालेला आनंद त्याने इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत सांगितला आहे. हा मराठमोळा अभिनेता म्हणजे समीर परांजपे. (Sameer Paranjape On Ashok Saraf)

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरूणाईचा’ या रिऍलिटी शोमध्ये अभिनेता, गायक समीर परांजपे याने हजेरी लावली आहे. या रिऍलिटी शोमध्ये नुकतीच अशोक सराफ व निवेदिता सराफ या कलाकार जोडीने हजेरी लावली होती. स्पर्धकांच्या सुमधुर आवाजातील गाणी ऐकण्यासाठी अशोक व निवेदिता यांची उपस्थिती होती. यावेळी समीरने अशोक सराफांना भेटल्यानंतरचा अनुभव, त्यांच्याकडून मिळालेली कौतुकाची थाप याबाबत खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – “पाखरं भरारी मारायला…”, ‘कुर्रर्रर्र’ नाटकामधून प्रसाद-नम्रताच्या एक्झिटनंतर विशाखा सुभेदारची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “माझ्या हाकेला…”

समीरने निवेदिता सराफ व अशोक सराफ यांच्या बरोबरचा फोटो शेअर करत, “आजचा एपिसोड, आजचं गाणं माझ्या आयुष्यातला तो क्षण आहे जो आयुष्यभर कायम अत्तरासारखा मनात दरवळत राहील आणि मला कायम विचारत राहील गाणं करतोयस ना? शूटींग सुरू झालं अशोक मामांची आणि निवेदिता ताईंची एन्ट्री झाली. मला बघून अशोक मामा म्हणाले अरे तू गातोस? मला वाटलं छान अभिनयचं करतोस फक्त. मी पाहिलंय तुझं काम. छान करतोस काम. ते मला ओळखतात त्यांनी माझं काम पाहिलंय हा माझ्यासाठी अभिनेता म्हणून अभिमानाचा क्षण होता. हो अभिमानच. गर्व म्हणा हवं तर आणि का नसावा?” असं समीरने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Sameer Paranjape (@sameer.paranjape2011)

आणखी वाचा – झी मराठीवरील लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांची भावुक पोस्ट, म्हणाले, “सांगायला थोडं कठीण…”

पुढे समीरने लिहिलं आहे की, “रविवारी दुपारी ४ वाजता दूरदर्शन वर लागणाऱ्या यांच्या फिल्म्स बघत मोठे झालो आणि आज पहिल्यांदा ते भेटतात आणि हे बोलतात अजून काय हवं एखाद्या नवीन अभिनेत्याला. या एपिसोडला गाणं ही ते मिळावं जे मला माझ्या गुरुंनी जवळपास २० वर्षांपूर्वी शिकवलं होतं. प्रोमो बघून नीलूताईंचा म्हणजेच नीलकांती पाटेकर यांचा आशीर्वादरुपी मेसेज यावा कृतज्ञता, रितेपण, वनवास संपल्याचा आनंद हे सगळं मी जगलोय” असं म्हणत त्याने पोस्ट शेअर केली आहे.

Tags: ashok sarafcolors marathientertainmentmarathi actornivedita sarafsameer paranjapesur nava dhyas nava
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
yeu kashi tashi mi nandayala fame actress anvita phaltankar shared post about bad experince in australia and alerted to international students

"त्रास होऊनही भाडं…", गेले चार महिने ऑस्ट्रेलियामध्ये राहत असलेल्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, "मानसिक आरोग्यावर परिणाम…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.