शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सध्या मी भारतात नाही पण…’, परदेशात असलेल्या मुक्ता बर्वेला करमेना, भावुक होत म्हणाली, “पहिल्यांदाच असं झालं असेल…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 6, 2024 | 11:46 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mukta Barve shared special post on social media in memory of India and naach ga ghuma movie

“सध्या मी भारतात नाही पण...’, परदेशात असलेल्या मुक्ता बर्वेला करमेना, भावुक होत म्हणाली, “पहिल्यांदाच असं झालं असेल…”

मराठी मनोरंजन विश्वातील बहुआयामी अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेचा उल्लेख हा केलाच जातो. मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून अभिनेत्रीने आजवर प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या अभिनयाने कायमच चर्चेत असणारी ही अभिनेत्री सध्या तिच्या नाच गं घुमा या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. १ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून सर्वत्र याच चित्रपटाची व या चित्रपटातील मुक्ताच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. मुक्ता तिच्या ‘चारचौघी’ नाटकाच्या दौऱ्यानिमित्त परदेशात असून तिला सध्या भारताची आठवण येत आहे. यानिमित्ताने तिने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

मुक्ताने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “तुम्हाला माहित आहे का, मी आत्ता भारतात नाही आहे. कदाचित पहिल्यांदाच असं झालं असेल की, माझ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मी नाही. त्यामुळे ‘नाच गं घुमा’ प्रदर्शित झाल्यापासून मला अस्वस्थ वाटत आहे. आम्ही कलाकार कलाकृती यासाठीच बनवतो की, ती प्रेक्षकांनी बघावी आणि भरभरून प्रेम करावं आणि प्रेक्षक चित्रपट बघून कौतुकाने आम्हाला डोक्यावरही घेत आहेत. पण हे सर्व मी चित्रपट बघण्याआधीच होत आहे.”

View this post on Instagram

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

आणखी वाचा –

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “सध्या चित्रपटाचं भरभरून कौतुक होत आहे. प्रेक्षकांना चित्रपट आवडत आहे, पण मी अजूनही चित्रपट पाहिलाच नाही आणि मला त्याची रुखरुख वाटते आहे. पण हरकत नाही, माझ्या नाटकावर माझं प्रेम आहे. माझ्या नाटकासाठी मी वचनबद्ध आहे आणि मी इकडे माझ्या ‘चारचौघी’ नाटकाचे दौरे अगदी उत्साहाने करते आहे. पण मनाने मी माझ्या टीमबरोबर, प्रेक्षकांबरोबर आणि माझ्या मराठी माणसांबरोबर आहे.”

आणखी वाचा –

यापुढे तिने चित्रपटाबद्दल उत्सुकता दर्शवत असं म्हटलं आहे की, “मी आता खूप आतुर आहे की, कधी मला माझाच (म्हणजेच आपला चित्रपट) चित्रपटगृहात जाऊन सर्वांबरोबर बघता येईल. त्यामुळे इथले सर्व प्रयोग यशस्वीरीत्या पार पाडून मी लवकरच भारतात येत आहे. माझ्या अनुपस्थितीमुळे जी काही कमी राहिली आहे ती मी आता भरून काढणार आहे. येत्या १२ मे पासून मी तुमच्याबरोबर असणार आहे. त्यामुळे लवकरच भेटूया आणि मज्जा करूया. तोपर्यंत चित्रपटगुहात ‘घुमोत्सव’ असाच उत्साहात साजरा होत राहू दे.

Tags: marathi actressmarathi entertainment newsmukta barve
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
pravin tarde home

Video : असं आहे प्रविण तरडे यांचं घर, बायकोने शेअर केलेल्या व्हिडीओमधील 'त्या' गोष्टीने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.