‘नेटफ्लिक्स’वरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या शोने खूप जास्त लोकप्रियता मिळवली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलकारांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली. या आधी कार्यमातील कपिल शर्मा व सुनील ग्रोव्हर यांचा अभिनय अधिक पसंत केला गेला. ‘गुत्थी’ हे पात्र सुनील ग्रोव्हरने साकारले होते. पण कार्यक्रम सुरु झाल्यानंतर काही वर्षांनी कपिल व सुनील यांच्यामध्ये वाद झाले. त्यामुळे सुनील या कार्यक्रमामधून बाहेर पडला. आता तब्बल सहा वर्षांनी कपिल व सुनील एकत्र काम करताना दिसत आहेत. नवीन कार्यक्रम ३० मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. (sunil pal on sunil grover )
नेटफ्लिक्सवर जेव्हा कार्यक्रम सुरु झाला तेव्हापासून प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल यांनी या कार्यक्रमावर टिका करत आले आहेत. हा कार्यक्रम पसंत नसल्याचे त्यांनी एकदा सांगितले होते. पण कपिलने ओटीटीवर जाणे टाळायला पाहिजे होते कारण तो एक टेलिव्हिजनवरील कलाकार असल्याचे ते म्हणाले होते. त्यांनी निर्मात्यांवर राग असल्याचेही सांगितले होते.
‘द ग्रेट इंडियन…’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर सुनील यांनी आनंद व्यक्त केला होता. तसेच ते म्हणाले की, “सुनील ग्रोव्हर नेहमीच रिंकू भाभी, गुत्थी,डफली तसेच अनेक महिलांचीच पात्र साकारताना दिसला आहे. त्याचप्रमाणे सुनील जेव्हा महिलांच्या रुपात समोर येतो आणि लोकांच्या मांडीवर बसतो हे अजिबात आवडत नाही. तसेच महिलांचे कपडे घालून अश्लील भाषा वापरणेदेखील योग्य वाटत नाही. लोक कपिल-सुनील यांच्या जोडीची आतुरतेने वाट का बघत होते? हे मात्र समजले नाही”, असेही त्यांनी सांगितले.
सुनील पाल यांनी सुनील ग्रोव्हरबद्दल बोलताना सांगितले की, “जेव्हापासून तो जसपाल भट्टी यांची सुटकेस उचलायचा तेव्हापासून मी त्याला ओळखतो. त्यावेळी त्याला शोमध्ये प्रवेशदेखील मिळायचा नाही. तसेच लोकं सुनील ग्रोव्हरला पाहण्यासाठी नाही तर कपिलला पाहण्यासाठी उत्सुक असतात”, असेही सुनील पाल म्हणाले.