Kartiki Gaikwad Baby Boy : काही दिवसांपूर्वीच कार्तिकीने आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली होती. कार्तिकीने सोशल मीडियावरुन याबाबतची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. आता अखेर कार्तिकी आई झाली असल्याची गुडन्यूज तिने चाहत्यांसह शेअर केली आहे. कार्तिकी व रोनित आई-बाबा झाले आहेत. कार्तिकीने तिच्या चिमुकल्या बाळाचे स्वागत केले आहे. कार्तिकीने गोंडस अशा मुलाला जन्म दिला आहे. कार्तिकीने आई झाली असल्याची गुडन्यूज सोशल मीडियावरुन चाहत्यांसह शेअर केली आहे.
कार्तिकीने थेट डोहाळ जेवणाचे फोटो शेअर आई होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली होती. कार्तिकी आई झाल्याची गुडन्यूज केव्हा देणार याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. अखेर कार्तिकीने आई झाली असल्याची बातमी देत तिला मुलगा झाला असल्याचं सांगितलं. सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत तिने तिच्या लाडक्या चिमुकल्या राजकुमाराचे स्वागत केले आहे. “आम्ही आमच्या राजकुमाराचे स्वागत करत आहोत. हा एक नवीन सापडलेला खजिना आहे. आम्हाला नवीन प्रेम सापडले आहे. हा क्षण खरंच व्यक्त करता येत नाही आहे. कारण मूल असण्याची ही भावना छान असते”, असं आनंद कार्तिकीने पोस्टमधून व्यक्त केला आहे.

लग्नाच्या चार वर्षांनी कार्तिकी आई झाली आहे. कार्तिकीने दिलेल्या या आनंदाच्या बातमीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कार्तिकीने २०२०मध्ये रोनित पिसेसह लग्नगाठ बांधली. कार्तिकीने आजवर तिच्या गायनाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावरही कार्तिकी बऱ्यापैकी सक्रिय असते. अशातच कार्तिकी आता आई झाली असल्याची पोस्टही सध्या तुफान व्हायरल होत आहे. मुलगा झाला असल्याने कार्तिकीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
कार्तिकीला एका मुलाखतीत मुलगा हवा की मुलगी?”, असा प्रश्न विचारला असता, यावर उत्तर देत गायिका म्हणाली की, “खरंतर मी असा काहीच विचार केला नाही आहे, मुलगा हवा की मुलगी. जे कुणी होईल मुलगा किंवा मुलगी त्या बाळाचं आरोग्य उत्तम असुदे. त्या बाळाकडून घरातल्यांची, मोठ्यांची, देशाची, धर्माची सगळ्यांची सेवा होवो. बाळ सुसंस्कृत होवो. आमच्यापरीने आम्ही त्याला किंवा तिला खूप चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करु”.