रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सून म्हणून घरी येणार कळताच…”, असे आहेत मृणाल दुसानीसचे सासू-सासरे, सासरच्या मंडळींबाबत अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली, “तो सुखद धक्का…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 14, 2024 | 5:31 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
mrunal dusanis talked about her mother-in-law and father and law

"सून म्हणून घरी येणार कळताच…", असे आहेत मृणाल दुसानीसचे सासू-सासरे, सासरच्या मंडळींबाबत अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली, "तो सुखद धक्का…"

छोट्या पडद्यावरील ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’, ‘मन हे बावरे’, ‘तू तिथे मी’, ‘अस्स सासर सुरेख बाई’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला चेहरा म्हणजे मृणाल दुसानीस. काही वर्षांपूर्वीच अभिनेत्री विवाहबंधनात अडकली. करिअरच्या शिखरावर असताना तिने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी तिची ‘हे मन बावरे’ ही मालिका चालू होती. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर मृणाल आपल्या नवऱ्याबरोबर अमेरिकेत राहायला गेली आणि ती तिथेच स्थायिक झाली. यानंतर अखेर चार वर्षांनी अभिनेत्री आपल्या कुटुंबीयांबरोबर पुन्हा एकदा भारतात परतली आहे.

काही दिवसांपूर्वी मृणाल भारतात परतली असून तिची पुन्हा एकदा मालिकांमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे.  नुकतीच तिने सुलेखा तळवलकरांच्या ‘दिल कें करीब’ मुलाखतीला उपस्थिती लावली होती. यावेळी तिने अमेरिकेतील काही किस्से चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. यावेळी तिने तिच्या प्रवासाबद्दल, नवऱ्याबद्दल तसेच तिची पुन्हा एकदा मालिकांत काम करण्याविषयीही संवाद साधला. यावेळी तिने तिच्या सासू-सासऱ्यांबद्दलही भाष्य केले.

View this post on Instagram

A post shared by मृणाल (@mrunaldusanis_official)

यावेळी मृणालने असं म्हटलं की, “माझ्या सासरच्या मंडळींनी माझी ‘तू तिथे मी’ मालिका पाहिली होती. जेव्हा ते घरात आले तेव्हा त्यांच्यासाठी ती खूपच छान भावना होती. तू तिथे मी मालिकेतल्या सूनेची भूमिका ही तशी सोशिक व सहन करणारी होती. त्यामुळे त्यांच्यासाठी तो एक सुखद धक्काच होता. कारण ती मालिका ते बघत होते.

आणखी वाचा – ‘बाहुबली’ ते ‘बस्तर’, येत्या आठडवड्यात ओटीटी प्रेक्षकांसाठी थ्रिलर व अ‍ॅनिमेटेड चित्रपटांची असणार मेजवानी, वाचा संपूर्ण यादी

यापुढे तिने असं म्हटलं की, “तेव्हा सासू-सासऱ्यांनी बाकी कुटुंबियांना मी त्यांच्या घरी येणार असल्याचं सरप्राइज ठेवलं होतं. पण सगळ्यांनाच कुठून कुठून कळलं होतं की मी सून म्हणून येणार आहे. त्यामुळे सगळेच खूप खुश होते. त्यांच्यासाठी ही गोष्ट नवीन होती. पण मी खूप वेगळी आणि स्पेशल आहे, अशी त्यांना जाणीव करुन दिली नाही”.

आणखी वाचा – “अती झालं”, ‘सातव्या मुलीची…’मध्ये रुपालीच्या डोळ्यांमध्ये नेत्राने मसाला फेकलेला प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, “राग येतो कारण…”

दरम्यान, मृणाल आता कोणत्या नवीन भूमिकेतून आणि कोणत्या नवीन मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याविषयी तिच्या अनेक चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे आता चार वर्षांनी भारतात परतल्यावर अभिनेत्री मालिकांमध्ये पुनरागमन केव्हा करणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे   

Tags: marathi actressmarathi entertainment newsmrunal dusanis
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
"त्यापेक्षा मालिकाच बंद करा", 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेवर प्रेक्षक नाराज, कथेतील ट्विस्ट पाहून म्हणाले, "दाखवण्यासारखं काहीच नसेल तर..."

"त्यापेक्षा मालिकाच बंद करा", 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेवर प्रेक्षक नाराज, कथेतील ट्विस्ट पाहून म्हणाले, "दाखवण्यासारखं काहीच नसेल तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.