एनडी स्टुडिओचे सर्वेसर्वा नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर अनेक चर्चांना तोंड फुटलं. नितीन देसाई यांनी आर्थिक अडचणींमुळे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याच्या चर्चा होत्या. पण नितीन देसाईंच्या मुलीने त्यांच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया दिली. दरम्यान तिने वडिलांबाबत होणाऱ्या चर्चा खोट्या असल्याचं सांगितलं. तसेच एनडी स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा असंही मत तिने व्यक्त केलं. आता राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी-रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
एनडी स्टुडिओबाबत सरकार नेमकं काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकार याबाबत काय निर्णय घेणार? हे पाहावं लागेल. पण त्यापूर्वीच उदय सामंत यांनी या संपूर्ण प्रकाराबाबत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. तसेच एनडी स्टुडिओ सरकारने ताब्यात घेण्याबाबत ते स्वतः राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहेत.
आणखी वाचा – फुलांची सजावट, विविध पदार्थ अन्…; मुग्धा वैशंपायनचं आजोळी थाटामाटात केळवण, म्हणाली…
उदय सामंत म्हणाले, “एनडी स्टुडिओ हा एका मराठी कलाकाराने स्वतःच्या मेहनतीने उभारलेला स्टुडिओ आहे. तो स्टुडिओ कंपनीच्या घशात जाण्यापेक्षा सरकार म्हणून तो ताब्यात घेऊ शकतो का? याविषयी मी देसाई कुटुंबियांशी, फायनान्स कंपनीशी चर्चा करणार आहे. त्यानंतरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रींना मी विनंती करणार आहे”.
आणखी वाचा – “तुमचं वय नेमकं किती?”, चाहत्याने प्रश्न विचारताच ऐश्वर्या नारकर यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या…
पुढे ते म्हणाले, “एनडी स्टुडिओ जर सरकारच्या ताब्यात राहिला तर रोजगार उपलब्ध होऊ शकतो. बॉलिवूडला लागणारी जागाही या स्टुडिओमध्ये मिळेल. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माझा पुढाकार राहील. मी याविषयी मुख्यमंत्र्यांशी नक्कीच संवाद साधेन”. आता राज्य सरकार एनडी स्टुडिओबाबत नेमका काय निर्णय घेणार हे येणारा काळच सांगू शकेल.