बरेचदा कोणाचं किती वय असेल हे कळून येत नाही. विशेषतः कलाकार मंडळींच्या बाबतीत हे फारसं घडलेलं पाहायला मिळतं. कलाकार मंडळींच्या त्यांच्या फिटनेसमुळे, योगामुळे त्यांचं वय कळून येत नाही. यांत उदाहरण द्यायचं झाल्यास अभिनेत्री ऐश्वर्या नारकरबद्दल बोलणं चुकीचं ठरणार नाही. वयाची त्यांनी पन्नाशी ओलांडली असल्याचं म्हटलं जातं मात्र अद्याप त्यांच्या खऱ्या वयाबद्दल स्पष्ट अशी माहिती समोर आलेली नाही. (Aishwarya Narkar On Her Age)
वयाची पन्नाशी ओलांडलेल्या ऐश्वर्या नारकर यांच्या सौंदर्याचे लाखो चाहते दिवाने आहेत. अतिशय निरागस, मनमोहक, लाघवी दिसणाऱ्या अभिनेत्रींमध्ये यांचं नाव आवर्जून घेतलं जात. ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या फोटोशूटने चाहत्यांना कायमच भुरळ घातली. वेगवेगळ्या फोटोशूटमुळे ऐश्वर्या नेहमीच चर्चेत असतात. या त्यांच्या फिट दिसण्याचं श्रेय त्या पूर्णतः फिटनेसला देतात. ऐश्वर्या या सोशल मीडियावरही बर्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावर नेहमीच ती चाहत्यांसोबत काही ना काही शेअर करून संपर्कात राहत असते.
हे देखील वाचा – फुलांची सजावट, विविध पदार्थ अन्…; मुग्धा वैशंपायनचं आजोळी थाटामाटात केळवण, म्हणाली…
अशातच ऐश्वर्या यांनी नुकतेच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन घेतला होता. यांत ऐश्वर्या यांच्या चाहत्यांनी या सेशनला भरभरून प्रतिसाद दिला. दरम्यान त्यांना एका चाहत्याने ‘तुमचं वय किती आहे’ असा प्रश्न विचारला होता. यावर ऐश्वर्या यांनी गमतीशीर उत्तर दिलं आहे. ऐश्वर्या यांनी चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देत म्हटलं आहे की, ‘असं काही नसतंच…’ असं म्हटलं आहे.
ऐश्वर्या यांची सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सुरु आहे. मालिकेतील रुपाली या त्यांच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांचं भभरून प्रेम मिळतं आहे.ऐश्वर्या व अविनाश दोघेही त्यांच्या फिटनेसची देखील विशेष काळजी घेतात. त्यांच्या योगाचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असतात.