नाटक, मालिका व चित्रपट अशा सर्वच माध्यमातून आपल्या अभिनयाची झलक दाखवणाऱ्या मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेत्री सुकन्या मोने. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामुळे सुकन्या मोने चर्चेत आल्या आहेत. छोट्या पडद्यावरील मालिकांमधून आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री सुकन्या मोने या केवळ उत्तम अभिनेत्री, नृत्यांगना नव्हे, तर उत्तम सुगरणही आहेत. त्याची प्रचिती अनेकदा दिसून आली. (Sukanya Mone Video)
अभिनेत्री सुकन्या मोने अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरही खूपच सक्रिय असतात. त्या अनेक फोटोज व व्हिडिओज नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहतात. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अभिनेत्री सुकन्या मोने लवकरच ‘इंद्रधनुष्य’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्या चित्रपटाचं शूटिंग सध्या लंडनमध्ये सुरु आहे. यानिमित्त अभिनेत्री सुकन्या मोने सध्या लंडनमध्ये असून तिथे त्या चित्रपटाच्या टीमसोबत धमाल करताना दिसत आहेत. लंडन येथे त्यांनी चित्रपटाच्या टीमसोबत चक्क कांदाभजी बनवली आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून कलाकार या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत.
हे देखील वाचा – फुलांची सजावट, विविध पदार्थ अन्…; मुग्धा वैशंपायनचं आजोळी थाटामाटात केळवण, म्हणाली…
सुकन्या मोने यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून भजी बनवतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सुकन्या मोने म्हणाल्या, “On set BTS.. Garam Garam bhajiyaan in London..” सुकन्या यांच्या या व्हिडिओवर अभिनेता स्वप्नील जोशीने कमेंट करत म्हटलंय, “कमाल! मस्त झाली होती भजी!” तर अभिनेत्री ऋजुता देशमुखने “शूट करताय ना?” अशी मजेशीर कमेंट केली आहे. त्याचबरोबर चाहतेही त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट्स करत आहे.
हे देखील वाचा – ११वेळा ऑपरेशन्स, गंभीर आजार, हाडांची मोडतोड अन्…; सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याची झालीय अशी अवस्था, म्हणाले, “मृत्यूशी लढाई…”
अभिनेत्री सुकन्या मोने यांनी आजवर अनेक मालिका, नाटक व चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातही त्या झळकल्या होत्या. ज्यात त्यांनी साकारलेले ‘साधना’ हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं आहे. आता सुकन्या मोने मोठ्या पडद्यावर दिसणार असून चाहते त्यांच्या या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. (Sukanya Mone makes bhaji during shoot in London)