गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लोक अनेकदा…”, ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये वयाने मोठे दिसणाऱ्यावरुन अपूर्वा नेमळेकर व तेजश्री प्रधान ट्रोल, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “आमचं वय…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 23, 2023 | 12:33 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
apurva nemlekar told on misfits for the roles

apurva nemlekar told on misfits for the roles

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोहोचणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. ती सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत आहे. यापूर्वी अपूर्वाने ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारली होती. तिने साकारलं हे पात्र प्रेक्षकांच्या बरंच पसंतीस पडलं. त्यानंतर आता ती ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून सावनी हे पात्र साकारत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून बरीच चर्चेत आहे. या मालिकेतील पात्रांबाबत काही नेटकऱ्यांमध्ये नाराजी असलेली दिसून आली. नुकतेच याबाबत एका मुलाखतीत अपूर्वाने वक्तव्य केलं आहे. (apurva nemlekar told on misfits for the roles)

‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रदर्शित झाल्यापासून विविध कारणांसाठी चर्चेत आहे. कधी ही मालिका नेटकऱ्यांकडून ट्रोल होताना दिसते तर कधी या मालिकेचं कौतुकही होताना दिसतं. पहिल्याच आठवड्यात टीआरपीच्या शर्यतीत तर ही मालिका अव्वल स्थानावर होती. पण या मालिकेतील मुख्य पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा व तेजश्री यांना या भूमिकांसाठी बरंच ट्रोल केलं जात आहे. प्रेक्षकांना आम्ही दोघं अभिनेता राज हंचनाळेपेक्षा वयाने मोठे दिसत असल्याचं वाटतं.

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

आणखी वाचा – “कित्येकदा एका नजरेने…”, ‘थ्री इडियट्स’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनानंतर पत्नीची पहिली पोस्ट, म्हणाली, “नेहमीच तू माझा होतास आणि…”

यावर अपूर्वाने ई-टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे. अपूर्वाला विचारण्यात आलं की, त्यांना काही नेटकरी ट्रोल करत आहेत की ती या भूमिकेसाठी चुकीची निवड आहे. त्यावर अपुर्वाने उत्तर दिताना सांगितलं, “हो, मी काही टिप्पणी वाचल्यात. ज्यात आम्हा तिघांना एकत्र पाहून काही नेटकरी आमचं कौतुक करतात. तर काहींना आम्ही या भूमिकेसाठी चुकीचे वाटतो. कारण मी व तेजश्री या पात्रांमध्ये राजपेक्षा वयाने मोठे वाटतो, असं लोकांचं म्हणणं आहे. पण लोकांना माहित नाही की आम्हा तिघांचे वय सारखेच आहे. आम्ही एकाच वयाचे आहोत. आम्ही तिघं या भूमिकांसाठी सारखीच मेहनत घेत आहोत.”.

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

आणखी वाचा – मुलीचं नाव काय ठेवणार? याबाबत राहुल वैद्यचा खुलासा, म्हणाला, “नावं काढली आहेत पण…”

अपूर्वा पुढे म्हणाली, “मला विश्वास आहे की लोक लवकरच आम्हा तिघांच्या वयाबाबत व दिसण्याबाबतचा दृष्टिकोन बदलतील. लोक अनेकदा अनेक गोष्टींबद्दल बोलतात. पण मी अशी व्यक्ती आहे, जी नेहमी मेहनत व कामावर लक्ष केंद्रीत करते. असे काही लोक आहेत ज्यांना आमची मालिकेतील भूमिका आवडत नाही किंवा आम्ही त्या भूमिकेसाठी त्यांना चुकीचे वाटते पण मला खात्री आहे की यापुढे ते आमच्याबद्दलचा हा विचार व दृष्टिकोन बदलतील. आम्ही ते आमच्या कामातून सिद्ध करून दाखवू”, अशा शब्दात तिने टिका करणाऱ्यांना अधिक मेहनत घेऊन उत्तर देऊ असं सांगितलं.  

Tags: apurva nemlekarhardworkmisfits for the rolesPeople trolledtejashri pradhan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
gauhar-khans-stolen-sunglasses-emirates-flight-ek508-mystery

दुबईहून मुंबईच्या दिशेने विमानप्रवास करताना सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या वस्तूची चोरी, संताप व्यक्त करत म्हणाली, "एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.