शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दुबईहून मुंबईच्या दिशेने विमानप्रवास करताना सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या वस्तूची चोरी, संताप व्यक्त करत म्हणाली, “एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 22, 2023 | 3:39 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
gauhar-khans-stolen-sunglasses-emirates-flight-ek508-mystery

दुबईहून मुंबईच्या दिशेने विमानप्रवास करताना सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या वस्तूची चोरी, संताप व्यक्त करत म्हणाली, "एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी…"

गौहर खान हे मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध नावांपैकी एक नाव आहे. एक लोकप्रिय टेलिव्हिजन स्टार होण्यापासून ते काही यशस्वी चित्रपटांमध्ये अभिनय करण्यापर्यंत गौहर खानने तीच असं स्थान सिनेसृष्टीत निर्माण केलं आहे. गेल्या काही वर्षांत गौहर खान अनेक चित्रपट, वेब शो आणि म्युझिक व्हिडीओमधून दिसली. यासोबतच गौहर खान तिच्या स्पष्ट मतांसाठीही ओळखली जाते. नुकतीच गौहर दुबईहून मुंबईत परतली तेव्हा आलेल्या वाईट अनुभवाबाबत अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे. (Gauhar Khan on Flight Experience)

गौहर खानने तिच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे, यांत तिने म्हटलं आहे की, “फ्लाइटमध्ये तिचा सनग्लासेस चोरीला गेला आहे. विमान कंपन्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंतीही तिने केली आहे. एअरलाइन्सला टॅग करत ‘बिग बॉस ७’ ची विजेती गौहर खानने लिहिलं आहे की, “अहो, काल तुमच्या दुबई ते मुंबई या फ्लाइटमध्ये माझा सनग्लासेस चोरीला गेला, मी उतरल्यावर तो फ्लाइटमध्येच राहिला होता आणि मी याबाबतची माहिती ताबडतोब इंडियन एअरलाइन्सलाच्या कर्मचाऱ्यांना दिली होती.

Hey @emirates , my sunglasses was stolen yesterday on ur flight ek508 from Dubai to mumbai , it was left behind on the aircraft when I disembarked n I informed the Indian ground staff immediately, they said they found a pair on my seat pocket of 9j but to my shock the packet…

— Gauahar Khan (@GAUAHAR_KHAN) September 21, 2023

पुढे ती म्हणाली की, “माझ्या सीटच्या खिशात 9j ची जोडी सापडली होती पण मला आश्चर्य वाटले की माझ्यासाठी आणलेल्या पॅकेटमध्ये दुसरी जोडी होती जी माझी नव्हती. मी तुमच्या मदत क्रमांकावर अनेक वेळा कॉल केला आणि पुराव्यासह ईमेल पाठवला, तेव्हाही प्रतिसाद मिळाला नाही. कृपया माझा चष्मा कोणी चोरला असेल तर तुमच्या नामांकित एअरलाइनमध्ये कॅमेरे बसवलेले आहेत जे सेवेसाठी आहेत त्याचा वापर करून चोर शोधा”.

आणखी वाचा – Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाच्या लग्नाबाबत मोठी माहिती समोर, पाहुण्यांना ‘ही’ गोष्ट वापरण्याची आहे मुभा

गौहर खान सोशल मीडिया सनसनाटी जैद दरबारच्या प्रेमात पडली. दोघांनी डिसेंबर २०२० मध्ये कोरोनाच्या काळात लगीनगाठ बांधली. जवळजवळ २ वर्षांनंतर, या जोडप्याने डिसेंबर २०२२ मध्ये त्यांनी बाळ होणार असल्याची गुडन्यूज दिली. ३० एप्रिल रोजी गौहर व जैदने मुंबईत एका भव्य बेबी शॉवर समारंभाचे आयोजनही केले होते. १० मे रोजी या गौहरने गोंडस अशा बाळाला जन्म दिला.

आणखी वाचा – दीपिका कक्कर व शोएब इब्राहिम यांनी पहिल्यांदाच दाखवला बाळाचा चेहरा, फोटो शेअर करत म्हणाला, “बाळाला…”

गौहर खान ‘इशकजादे’, ‘बेगम जान’ आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनायसह झळकली. ‘झलक दिखलाजा 3’, ‘बिग बॉस 7’ आणि ‘खतरों के खिलाडी 5’ सारख्या रिऍलिटी शोमध्येही तिने सहभाग घेतला होता. ही अभिनेत्री ‘बिग बॉस ७’ ची विजेती ही ठरली.

Tags: big boss 7entertainmentgauhar khan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
anupam kher sold mumbai home
Entertainment

भाड्याने राहायला सुप्रसिद्ध अभिनेत्याने विकलं घर, २२ वर्षात आलिया भट्टने घेतल्या अभिनेत्याच्या दोन्ही मालमत्ता, किंमत…

एप्रिल 25, 2026 | 10:18 am
Nehha Pendse tv shows
Entertainment

“त्याने मला अचानक पकडलं”, मुंबईच्या भररस्त्यात अभिनेत्रीसह घडलं असं काही की…; म्हणाली, “जवळ जाऊन…”

एप्रिल 25, 2026 | 9:57 am
Next Post
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : 'या' महागड्या हॉटेलमध्ये पार पडणार परिणिती व राघवचा शाही विवाहसोहळा, एका दिवसाचं भाडं आहे तब्बल…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.