Ankita Lokhande Father Death : सुप्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंकिताचे वडील श्रीकांत लोखंडे यांचं आज निधन झालं. मुंबईमधील राहत्या घरी त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी आणण्यात आलं आहे. मात्र श्रीकांत लोखंडे यांचं निधन नेमकं कशामुळे झालं? याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. १३ ऑगस्ट (रविवारी) सकाळी ११ वाजता ओशीवरा स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार अंकिताच्या राहत्या घरी तिच्या तिचे वडील श्रीकांत लोखंडे यांना आणण्यात आलं आहे. अंकिताचं तिच्या वडिलांवर जीवापाड प्रेम होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने तिच्या वडिलांबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. तसेच काही मुलाखतींमध्येही अंकिताने तिचं वडिलांबाबत असणारं प्रेम बोलून दाखवलं.
श्रीकांत लोखंडे यांच्या अचानक जाण्याचे संपूर्ण कुटुंबियांना दुःखद धक्का बसला आहे. अंकिताचे वडील बँकर होते. अगदी सामान्य कुटुंबातून आलेल्या अंकिताला तिच्या आई-वडिलांनी कलाक्षेत्रात काम करण्यासाठी अधिकाधिक प्रोत्साहन दिलं. शिवाय तिच्या खासगी आयुष्यात घडत असलेल्या प्रसंगांनाही सामोरं जाण्याची ताकद अंकिताला तिच्या वडिलांकडून मिळाली.
आणखी वाचा – Gadar 2 First Review : कसा आहे सनी देओलचा ‘गदर २’ चित्रपट, पहिला शो बघितल्यानंतर प्रेक्षक म्हणाले…
२००९मध्ये एकता कपूरची ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमधून अंकिताला मोठा ब्रेक मिळाला. मालिकेमध्ये काम करण्यापूर्वीही अंकिताला तिच्या कुटुंबियांनी मोठा पाठिंबा दिला. अंकिताच्या संपूर्ण करिअरमध्ये तिच्या आई-वडिलांचा खारीचा वाटा आहे. शिवाय अलिकडेच अंकिता पती विकी जैनसह परदेशात गेली होती. वडिलांच्या निधनानंतर अंकितालाही मोठा धक्का बसला आहे.