शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पृथ्वीक प्रतापचं मोठं मन, अमेरिकेत शो करत असताना दत्तू मोरेसाठी केली मोठी गोष्ट, प्रियदर्शिनी म्हणते, “पहिल्या दोन शोनंतर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 11, 2023 | 11:17 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Prithvik Pratap On Dattu More

Prithvik Pratap On Dattu More

सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने साऱ्यां रसिक प्रेक्षकांना वेड लावलं आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाने काही दिवसांचा ब्रेक घेत परदेश दौरा सुरु केला होता. अमेरिकेतल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी हे कलाकार अमेरिका दौरा करण्यात व्यस्त होते. आता परदेश दौरा संपवून हे कलाकार पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला सज्ज होत आहेत. अमेरिका दौरा करताना अनेक किस्से घडले यातील एक किस्सा प्रियदर्शिनीने सांगितला आहे. (Prithvik Pratap On Dattu More)

‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्रियदर्शिनीने पृथ्वीकचा एक किस्सा सगळ्यांसमोर आणला. हास्यजत्रेतील कलाकारांच्या पडद्यावर जस बॉण्डिंग आहे तसेच बॉण्डिंग पडद्यामागे देखील आहे. त्यांच्यातील मैत्री नेहमीच आपल्याला पाहायला मिळते.

पाहा पृथ्वीकने दत्तूसाठी काय केलं (Prithvik Pratap On Dattu More)

‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली तेव्हा ही त्यांची घट्ट मैत्री पाहायला मिळाली. किस्सा सांगताना प्रियदर्शिनी म्हणाली की, “पृथ्वीक किती डाउन टू अर्थ आहे, याचा मला एक किस्सा सांगायचा आहे. आमच्या सगळ्यांचीच एकत्र प्रगती होत आहे, याची एक वेगळीच मज्जा येतेय”.

हे देखील वाचा – वडील रवींद्र महाजनींच्या निधनानंतर गश्मीरने पहिल्यांदाच शेअर केलेल्या पोस्टची चर्चा, म्हणाला, “रात्री आभाळाकडे पाहिलं अन्…”

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

“आम्ही अमेरिकेच्या दौऱ्यावर होतो. त्यावेळेस शोमध्ये प्रत्येकाच्या एंट्रीला वेगवेगळ्या टाळ्या यायच्या. पण पृथ्वीक आणि दत्तू हे दोघं एकत्र एंट्री घ्यायचे, हे आम्हाला एक-दोन शोनंतर लक्षात आलं. मग हेच पृथ्वीकच्या लक्षात आलं की, दत्तूसाठी वेगळ्या टाळ्या आहेत. त्यामुळे पृथ्वीक स्टेजवर पहिला दत्तूला पुढे पाठवायचा, त्याच्या टाळ्या घेऊ झाल्यानंतरच मग पृथ्वीक स्वतःची एंट्री करायचा.”

हे देखील वाचा – ‘नाकात नथ, कपाळी चंद्रकोर अन्…’, प्रार्थना बेहरेला मराठमोळ्या लूकमध्ये पाहून भारावून गेला श्रेयस तळपदे, म्हणाला, “मॅडम…”

हास्यजत्रेतील सगळेच कलाकार डाऊन टू अर्थ आहेत. सगळ्याच कलाकार मंडळींनी शून्यातून आपलं विश्व स्वमेहनतीवर तयार केलं आहे. प्रत्येक कलाकाराने स्वतःचा असा चाहता वर्ग ही निर्माण केला आहे. येत्या १४ ऑगस्ट पासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Tags: dattu moremaharashtrachi hasyajatramhjprithvik pratappriyadarshini indalkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Gadar 2 Movie Review

Gadar 2 First Review : कसा आहे सनी देओलचा ‘गदर २’ चित्रपट, पहिला शो बघितल्यानंतर प्रेक्षक म्हणाले...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.