Gadar 2 Movie Review : सनी देओलचा ‘गदर एक प्रेमकथा’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाच्या नावाचाही समावेश आहे. आता जवळपास २२ वर्षांनी ‘गदर’चा सीक्वेल प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. अखेरीस ‘गदर २’ चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला आहे. ‘गदर एक प्रेमकथा’च्या सुपरहिट यशानंतर प्रेक्षकांना चित्रपटाच्या दुसऱ्या भागाकडूनही बऱ्याच अपेक्षा आहेत. आता हा चित्रपट नेमका कसा आहे? याबाबत सिनेरसिक सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसत आहेत. (Gadar 2 Movie Release)
‘गदर २’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर गर्दी करत आहेत. त्याचबरोबरीने फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चित्रपटाच्या तिकिटांचं आगाऊ बुकिंगही अनेकांनी केलं. पण चित्रपट पाहिल्यानंतर काही प्रेक्षक निराश झाले असल्याचं पाहायला मिळालं. ट्वीटरद्वारे प्रेक्षकांनी चित्रपट नेमका कसा आहे? हे सांगण्यास सुरुवात केली आहे.
Gadar 2 public review 😣#Gadar2review #Gadar2 pic.twitter.com/srRKOnekkF
— Karan Rathod (@KaranRatho66987) August 11, 2023
प्रेक्षकांना ‘गदर २’चा फर्स्ट हाफ खुर्चीमध्ये खिळवून ठेवणारा वाटला. तर त्यानंतरची कथा रट्याळ वाटली. तर काहींना हा चित्रपट अधिक आवडला असल्याचं पाहायला मिळालं. ‘गदर २’ प्रदर्शित झाल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहे. ज्या सिनेरसिकांना नव्वदच्या दशकातील चित्रपट पाहण्याची आवड आहे त्यांना नक्कीच हा चित्रपट आवडेल असंही अनेकांनी म्हटलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं आहे. तर सनी देओल, अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा आदी कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
Public ko #Gadar2 below average lag raha hai.Wohi typical masala
— MAMA THAKUR (@mamathakur68) August 11, 2023
movie with bhojpuri style action.#Gadar2Review
Better watch content oriented #OMG2#OMG2Review#AkshayKumar𓃵pic.twitter.com/RJWYM7gIoD
बुधवार (९ ऑगस्ट) पर्यंत ‘गदर २’च्या ३ लाखांपेक्षा अधिक तिकिटांची विक्री झाली होती. Sacnilkच्या वृत्तानुसार हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ३५ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करेल. शिवाय ‘गदर २’ बरोबर बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमार “OMG 2” चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठीही प्रेक्षक आतुर आहेत. आता कोणता चित्रपट सर्वाधिक कमाई करणार? आणि कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.