शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची क्लिप चोरीला, अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल, नेमकं प्रकरण काय ?

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 12, 2023 | 6:01 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Jawan Movie Clip viral

शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाची क्लिप चोरीला, अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल, नेमकं प्रकरण काय ?

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान गेल्या अनेक दिवसांपासून ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. आता शाहरुख त्याच्या आगामी चित्रपटांच्या जोरदार तयारीला लागला आहे. त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. याच चित्रपटाबाबत आता एक वेगळीच घटना घडली आहे. (Jawan Movie Clip viral)

यानिमित्त शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. आतापर्यंत पोस्टर व पहिलं गाणं प्रदर्शित झाल्यानंतर लवकरच चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, हे सर्व सुरु असताना चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटातील काही क्लिप्स चोरीला गेल्या असून त्या ऑनलाईन लीक झाली आहे. याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा – महिलेने पैसे मागताच शाहरुख खानच्या लेकीने काय केलं पाहा; व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाले, “अगदी बापावर…”

रेड चिलीज एंटरटेनमेंटने काही जणांवर ‘जवान’ चित्रपटाच्या क्लिप चोरून त्या ऑनलाइन लीक केल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओ लीक करणाऱ्या पाच ट्विटर हँडलची ओळख पटली असून त्यांना कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली आहे. याआधीही जवानची क्लिप ऑनलाइन लीक झाली होती, तेव्हा दिल्ली उच्च न्यायालयाने सर्व प्लॅटफॉर्म्सवरून ‘जवान’चे क्लिप काढून टाकण्याचे निर्देश दिले होते.

हे देखील वाचा – ‘गदर २’ च्या प्रीमिअरला नाना पाटेकरांची हवा, व्हिडिओ होतोय व्हायरल..

शाहरुखच्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन एटली यांनी केले असून संगीत अनिरुद्धने दिले आहे. चित्रपटात शाहरुखसह अभिनेत्री नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा ​​व अन्य कलाकारही दिसणार आहे. (Jawan Movie Clip viral)

Tags: bollywood moviejawanshahrukh khan
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Pooja Sawant on her Ideal Life Partner

“मला लग्न करायचं आहे पण…”, पूजा सावंतचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “पैसा कधीही…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.