Raghav Parineeti Wedding : बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा व खासदार राघव चड्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’ येथे २४ सप्टेंबरला हा शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे. नुकतीच ही जोडी त्यांच्या कुटुंबियांसह उदयपूर येथे पोहोचली आहे. दोघांच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवातसुद्धा झाली आहे. दरम्यान, या दोघांच्या लग्नाबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते आतुरलेले असून त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे. (Parineeti Raghav Wedding Venue)
परिणिती आणि राघव यांचं लग्न ज्या हॉटेलमध्ये पार पडणार आहे, त्या हॉटेलमधील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. याबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. उदयपूर येथील ‘द लीला पॅलेस’ जगातील १०० सर्वोत्तम हॉटेल्सपैकी एक आहे. त्यातील महाराजा सूट हा या हॉटेलच्या सर्वात खास रुमपैकी एक रुम आहे. परिणीती व राघवसाठी हाच सूट बुक करण्यात आला आहे. तब्बल ३६०० स्क्वेअर फुटाच्या या सूटचं एका दिवसाचं भाडं तब्बल १० लाख रुपये इतकं आहे.
या हॉटेलमध्ये २०० लोक एकत्र येतील इतका मोठा बँक्वेट हॉल आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, हे हॉटेल पूर्णपणे पर्वत आणि तलावाने वेढलेलं आहे. याचबरोबर भव्य संगमरवरी कला, टिकरी कला, नक्काशी, इतर कलाकुसर यामुळे हे हॉटेल आणखीन सुंदर दिसत आहे. या पॅलेसमध्ये जाण्यासाठी ग्राहकांना बोटीने किंवा रस्त्याने जावं लागतं.
हे देखील वाचा – दुबईहून मुंबईच्या दिशेने विमानप्रवास करताना सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या वस्तूची चोरी, संताप व्यक्त करत म्हणाली, “एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी…”
येत्या २३ व २४ सप्टेंबरला या दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. २३ सप्टेंबरला मेहंदी, हळदी आणि संगीताचे कार्यक्रम होईल. तर २४ सप्टेंबरला हे दोघं विवाहबंधनात अडकणार आहे. त्यानंतर याच हॉटेलमध्ये भव्य रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला चोप्रा व चड्ढा कुटुंबियांसह बॉलिवूड कलाकार व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.