शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रेम, विवाह, नऊ वर्षांमध्येच घटस्फोट अन्…; पतीने साथ सोडल्यानंतर मुलीसह असं जीवन जगत आहे जुही परमार

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 22, 2023 | 6:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
TV Actress Juhi Parmar life after Divorce

प्रेम, विवाह, नऊ वर्षांमध्येच घटस्फोट अन्...; पतीने साथ सोडल्यानंतर मुलीसह असं जीवन जगत आहे जुही परमार

हिंदी मालिका ‘कुमकुम’ मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री जुही परमारचे देशभरात मोठी फॅन फॉलोविंग आहे. तिच्या सौंदर्यतेबरोबरच साधेपणाची नेहमीच चर्चा होत असते. मात्र, या अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, त्यामुळे बराच काळ ती या क्षेत्रापासून लांब राहिली आहे. असं असलं तरी सोशल मीडियावर नेहमीच तिची सतत चर्चा होत असते. (TV Actress Juhi Parmar life after Divorce)

मात्र, एक काळ असा होता की, जुही परमार त्याकाळातील आघाडीच्या टीव्ही अभिनेत्रींमध्ये ओळखली जायची. जुही परमार गेल्या अनेक वर्षांपासून टीव्ही मालिकांमध्ये काम करत आहे. १९९८ मध्ये ‘वो’ ही तिची पहिली मालिका. त्यानंतर दोन वर्षांनी ती ‘चूड़ियां’ आणि ‘ये जीवन है’ या मालिकांमध्ये झळकली होती. मात्र, २००२ मध्ये आलेल्या ‘कुमकुम’ या मालिकेतून तिने पुनर्पदार्पण केले आणि तिला एक वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर ती ‘बिग बॉस’च्या एका पर्वात सहभागी झाली होती. जुहीने मालिकांबरोबर अनेक चित्रपटांमध्ये छोटी-मोठी भूमिकासुद्धा केली आहे.

हे देखील वाचा – दुबईहून मुंबईच्या दिशेने विमानप्रवास करताना सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या वस्तूची चोरी, संताप व्यक्त करत म्हणाली, “एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी…”

View this post on Instagram

A post shared by Juhi Parmar (@juhiparmar)

एकीकडे अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली असताना तिचं नाव अभिनेता सचिन श्रॉफबरोबर जोडलं गेलं होतं. त्यावेळेस या दोघांची जोडी टीव्हीमधील सर्वात लोकप्रिय जोडींपैकी एक होती. अनेक वर्ष एकमेकांना देत केल्यानंतर ही जोडी २००९ मध्ये विवाहबंधनात अडकली. मात्र, लग्नानंतर काही वर्षातच दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. त्यानंतर या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.

हे देखील वाचा – Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : ‘या’ महागड्या हॉटेलमध्ये पार पडणार परिणिती व राघवचा शाही विवाहसोहळा, एका दिवसाचं भाडं आहे तब्बल…

२०१८ मध्ये जुही परमार आणि सचिन श्रॉफ यांचा घटस्फोट झाला आणि तिच्या मुलीची कस्टडी जुहीला मिळाली. सध्या जुही मुलगी सामायरासह आनंदी जीवन जगताना दिसत आहे. छोट्या पडद्यावर फारशी सक्रिय नसली, मात्र ती अनेक वेबसीरिजमध्ये दिसली आहे. त्याचबरोबर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असून तिच्या फोटोज आणि व्हिडिओची चर्चा होत असते.

Tags: bigg bosshindi tv serialjuhi parmarTV Actress Juhi Parmar life after Divorce
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
akshay kumar aqua workout in water

५६व्या वर्षीही एकदम फिट आहे अक्षय कुमार, पाण्यात वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ व्हायरल; म्हणाला, “मला हा व्यायाम…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.