अशोक मामा आणि निवेदिता ताई या जोडी बदल बोलावं तेवढं थोडंच आहे. आपल्या अभिनय कौशल्याने खूप मोठा काळ ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. एका पेक्षा एक चित्रपट, मालिका, नाटक त्यांनी कलाविश्वाला दिले आहेत. त्यांच्या कामसोबतच एक आदर्श जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात.(Nivedita Saraf Aniket Saraf)

अनेक कलाकारांची मुलं आपल्या आई वडिलांच्या पाठोपाठ सिनेविश्वात स्वतःचे स्थान निर्माण करण्याचं प्रयत्न करतात. काहिक वेळेला हे गृहीत धरलं जात की, अभिनेत्यांची मुलं अभिनेता किंवा अभिनेत्रीच होणार. परंतु काहींकजण या गोष्टीला अपवाद असतात. आई- वडील दोघे ही अभिनय क्षेत्रात असून त्यांच्या नावाचं इतकं लौकिक असून मामा आणि निवेदितांच ताईंचा मुलगा अनिकेत मात्र अभिनय क्षेत्राकडे वळला नाही ही गोष्ट
शेफ होण्यासाठीची त्याची जिद्द वाखाणण्याजोगी आहे . घरात अभिनयाचा वारसा असताना वेगळी वाट निवडण्याची हिंमत त्याने दाखवली.
हे देखील वाचा : शेफ होण्याआधी मामांचा मुलगा करत होता ‘हे’ काम
शेफ होण्याचा अनिकेतचा प्रवास सोपा नव्हता. पॅरिस मध्ये अनिकेतने त्याच शिक्षण पूर्ण केलं. त्याने जो मार्ग निवडला होता, त्याची काहीच पार्शवभूमी त्याच्या घरात नव्हती. त्यामुळे अनेक गोष्टी मॅनेज करत त्यानं हे साध्य केलं. या बाबत बोलताना मामानी सांगितलं आहे. अनिकेत तसा लाडात वाढला होता. परंतु पॅरिस मध्ये असताना त्याला अनेक तडजोडी कराव्या लागल्या. आणि त्याने त्या केल्या या गोष्टीच मला कायम कौतुक आहे. (Nivedita Saraf Aniket Saraf)
पाहा काय होता अनिकेतचा किस्सा (Nivedita Saraf Aniket Saraf)
परंतु एकुलतं एक मुलं तेही अगदी लाडात वाढलेलं, तर त्यांचे खाण्याचे फार नखरे असतात. त्यात मग ते मुलं शेफ असेल तर काय म्हणायच. याच संदर्भात इट्स मज्जाला दिलेल्या एका मुलाखतीत निवेदिता ताईंनी म्हंटले,
वरण, भात, बटाटयाच्या काचऱ्या माझ्या मुलाचं लहानपणीच जेवण होत. तो लहान होता तेव्हा जर त्याला विचारलं अनिकेत तुला जेवणात काय हवं ? तेव्हा तो वरण, भात, बटाटयाच्या काचऱ्या, तूप, लिंबू, मीठ असं एका स्वरात सांगयचा. (Nivedita Saraf Aniket Saraf)
या किस्यामधून घरात जपलेलं साधेपण आपल्याला कळून येत. मुलांच्या लहानपणीचे किस्से आई कायम मनात साठवून ठेवते.तर अनिकेतचा लहानपणीच हा किस्सा निवेदिता ताईंसाठी खूप खास आहे. तसाच ताई आपल्या सहकलाकारानं वर देखील अगदी आपल्या मुलानं प्रमाणे माया करतात.