रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

४८ वर्षापासूनच एकच अंगठी का आहे अशोक मामांच्या हातात

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 7, 2023 | 3:21 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Ashok Saraf Ring Story

Ashok Saraf Ring Story

अशोक सराफ हे फुल पॅकेज आहेत. कसलीच कमी या व्यक्तीत नाही. असा नट होणे नाही हे वाक्य अर्थात अशोक मामांसाठीच आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे अशोक मामा यांचे आजही जमिनीवर पाय आहेत. सह कलाकाराला सांभाळून घेत त्यांनी आजवर मराठी सिनेसृष्टीत चांगलं नाव कमावलं आहे. मराठी सिनेविश्वात चित्रपटांची जेव्हा चलती नव्हती तेव्हा मामांच्या अभिनयाने सिनेविश्वातील तो काळ सावरला. मामांचे बरेच किस्से आहेत जे ऐकत राहावे, वाचत राहावे वाटतात, मात्र मामाच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक वस्तू होती त्याबाबतचा किस्सा त्यांनी मी बहुरूपी या पुस्तकात सांगितला आहे.(Ashok Saraf Ring Story)

हे देखील वाचा – वडिलांच्या निधनाला कुठे होते अशोक सराफ ?

हा किस्सा म्हणजे अशोक मामांच्या हातात असलेली त्यांची अंगठी. गेली ४८ वर्ष त्यांनी ती अंगठी का जपून ठेवलीय चला जाणून घेऊयात. १९७४ साली अशोक मामांना ही अंगठी त्यांचा मित्र विजय लवेकर यांनी दिली होती. विजय लवेकर हे एक मेकअपआर्टिस्ट असून त्यांचं एक छोटंसं सोनाराचं दुकान होतं. विजय लवेकर यांनी बनवलेल्या काही खास डिझाईनच्या अंगठ्या ते स्टुडिओमध्ये घेऊन आले होते. त्या वेळी बऱ्याच अंगठय त्यांनी डिझाईन करून आणल्या होत्या, नेमकी कुठली अंगठी निवडावी हा प्रश्न मनात न ठेवता त्यांनी त्यातील एक अंगठी निवडली जी त्यांनी लगेचच अनामिकेत घातली.

का जपलीय मामांनी ती अंगठी (Ashok Saraf Ring Story)

त्या अंगठीवर नटराजाची प्रतिमा कोरण्यात आली होती. विशेष म्हणजे अशोक मामांच्या बोटात ही अंगठी अगदी फिट बसली होती त्या अंगठीकडे निरखून पाहत असताना ही अंगठी माझी अशी प्रतिक्रिया अशोक मामांनी दिली. अंगठी घातल्यानंतर बरोबर तीन दिवसांनी अशोक सराफ यांना चांगले अनुभव येत गेले. या अंगठीची कमाल सांगायची म्हणजे अंगठी घातल्याचा तिसऱ्याच दिवशी त्यांच्या वाट्याला पांडू हवालदार चित्रपटाची ऑफर चालून आली. ही अंगठी अशोक मामांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारे ठरलीच शिवाय त्यांच्या या चित्रपटानेही त्यांच्या सिनेविश्वातील कारकिर्दीला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली.(Ashok Saraf Ring Story)

हे देखील वाचा – शेफ असूनही निवेदिता यांच्या मुलाला – आवडतो आईच्या हातचा ‘तो’ पदार्थ

या चित्रपटांनंतर मामांचा सिनेसृष्टीतील आलेख हा चढताच राहिला. अनेक दर्जेदार चित्रपटांच्या ऑफर्सही त्यांना येऊ लागल्या. आणि त्यांची यशाच्या वाटेने घोडदौड सुरू झाली. त्यावेळी मामा म्हणाले, ह्यावर माझी श्रद्धा आहे किंवा अंधश्रद्धा काहीही बोला पण ही अंगठी बोटातून काढायची नाही असा मी निर्णय घेतला होता. एक साधी अंगठी  एका व्यक्तीच्या आयुष्यात इतका बदल घडवून आणू शकते हे अचंबित करणारच आहे.

Tags: ahok sarafashok saraf storyentertainmentits majjaitsmajjaexclusivemarathi movienivedita saraf
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Ashvini Mahangade Romantic Post

'आई कुठे काय करते' फेम अश्विनीने केला खऱ्या आयुष्यातील जोडीदारा बद्दल खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.