बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kapil Honrao Social Media Break

तुलना, प्रेशर अन्...; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, "शर्यतीपासून..."

Kapil Honrao Social Media Break : मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा अभिनेता कपिल होनराव सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. वाढता स्क्रीन टाईम, सोशल मीडियावरील लाईक्स-कमेंट्सचा ताण आणि सततच्या पोस्टिंगच्या शर्यतीपासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय कपिलने घेतला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने काही दिवस सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याची माहिती चाहत्यांना दिली.

कपिल होनराव यांनी आपल्या पोस्टमध्ये सोशल मीडिया वापरामुळे निर्माण होणाऱ्या विविध दबावांवर भाष्य केले. “वाढता स्क्रीन टाईम, लाईक्स-कमेंट्सचा ताण, इतरांच्या पोस्ट्स पाहून होणारी तुलना, रोज कमी होणारे फॉलोअर्स पाहून वाटणारं प्रेशर आणि सतत काहीतरी पोस्ट करण्याच्या शर्यतीपासून थोडा वेळ ब्रेक घेऊन स्वतःला रिचार्ज करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा – हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

पुढे त्यांनी असं म्हटलं की, “या ब्रेकच्या काळात अॅक्टिंग क्राफ्ट, पुस्तक वाचन, स्वतःला ग्रूम करणे आणि फिटनेस यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही कपिल यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियाच्या आभासी जगापेक्षा खऱ्या आयुष्यात शिकण्यासारखे आणि जगण्यासारखे खूप काही आहे”, असेही त्यांनी आपल्या पोस्टमधून अधोरेखित केले.

आणखी वाचा – कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

“मी लवकरच परत येईन. Back with a bang,” असे म्हणत कपिल यांनी चाहत्यांना पुन्हा भेटण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या निर्णयाची सोशल मीडियावर चर्चा होत असून, काही काळ डिजिटल दुनियेपासून दूर राहून स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासावर आणि अभिनयकलेवर लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा हा निर्णय लक्षवेधी ठरत आहे.

Tags: kapil honraomarathi actorSocial Media Break
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.