Leena Bhagwat Health Update : कलाकारांचं आयुष्य बाहेरून पाहताना खूप सुंदर, झगमगणारं वाटतं. पण त्या झगमगाटामागे असते सततची धावपळ, शूटिंगचे तास, प्रयोग, प्रवास, जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या आयुष्याकडे दुर्लक्ष करण्याची वेळही अनेकदा येते. आपण कलाकारांना त्यांच्या भूमिकांमधून ओळखतो; पण त्या भूमिकांमागेही एक माणूस असतो, ज्याला थकवा येतो, विश्रांतीची गरज असते, कधी कधी थांबण्याचीही गरज असते.‘ब्रेक घेणं म्हणजे थांबणं नाही… स्वतःला पुन्हा उभं करण्यासाठी घेतलेली एक सुंदर विश्रांती असते.’ अभिनेत्री लीना भागवत यांनी अभिनयाच्या धावपळीतून थोडा ब्रेक घेतला आहे. सध्या त्या रुग्णालयात असून त्यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
लीना यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये असल्याचं दिसत आहे. आणि कॅप्शनमध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की, “मेरी आवाज ही पेहचान है”, आता पुढचे काही दिवस “कसं वाटलं नाटक?” असं म्हणता येणार नाही. हेच कशाला काहीच बोलता येणार नाही. गेले काही दिवस फक्त एकच गाणं आठवतंय मेरी आवाज ही पेहचान है, एका कलाकारासाठी त्याचा आवाज हीच खरी त्याची ताकद असते. मागच्या वर्षीपासून आमने सामनेचे प्रयोग लागोपाठ housefull जातायत. प्रयोग बघताना जेवढी मजा तुम्हाला येते तेवढीच आम्ही कलाकार सुद्धा करतो”.
आणखी वाचा – तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

पुढे त्यांनी असं लिहिलं, “‘आमने सामने’ मधल्या माझ्या पात्राला दिलेलं प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही. पण गेले काही महिने आवाजावर ताण यायला सुरुवात झाली होती. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग करू लागले पण शेवटी डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली… पेहचान टिकवायची असेल तर एक छोटी procedure करावीच लागेल. आणि अखेर काल ती procedure पार पडली. डॉक्टर त्यांची संपूर्ण टीम, मंगेश, नाटकाची टीम पूर्ण वेळ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आता काही दिवस आवाजाला विश्रांती देतेय. थोड्या दिवसांनी अजून ताकदीने उभी राहीन आणि पुन्हा म्हणेन “कसं वाटलं नाटक?”. तोपर्यंत एक छोटासा मध्यांतर… लवकरच भेटू आमने सामने”.
आणखी वाचा – हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
लीना यांच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.




