रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Ravi Jadhav on Nitin Desai: “तेव्हा त्यांनी मला फोन केला अन्…” नितीन देसाईंना अखेरचा निरोप देताना रवी जाधव भावुक, म्हणाले, “मला एनडी स्टुडिओमध्ये बोलावलं होतं कारण…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 4, 2023 | 3:29 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Director Ravi Jadhav on Nitin Desai Demised

नितीन देसाई अंत्यसंस्कार

Nitin Desai Funeral Update : चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी (२ ऑगस्ट) गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या निधनाच्या बातमीने कलाविश्व गहिवरलं आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं, तरी आर्थिक अडचणींमुळे हे सगळं घडल्याचे माध्यमांमध्ये बोललं जात आहे. (Nitin Desai Suicide)

नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज एन.डी. स्टुडिओ येथे अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. दुर्दैवी म्हणजे, ज्या नितीन देसाई यांनी ‘जोधा अकबर’ चित्रपटाचा भव्यदिव्य सेट जिथे उभारला तिथेच त्यांना आज अखेरचा निरोप दिला जात आहे. आज सकाळपासूनच अनेकांनी नितीन देसाईंना अखेरचा निरोप देण्यासाठी एन.डी. स्टुडिओमध्ये गर्दी करत असून अनेक राजकीय नेते व कलाकारांनी नितीन देसाईंच्या पार्थिवाचे दर्शन घेतलेले आहे.

हे देखील वाचा – Nitin Desai Funeral : फुलांची सजावट, तुफान गर्दी अन्…; नितीन देसाईंना पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले, व्हिडीओ व्हायरल

दिग्दर्शक रवी जाधव यांनी नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे. यावेळी अंतिम दर्शन घेताना दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले, “माझ्यासारख्या असंख्य मध्यमवर्गीय मुलांसाठी नितीन दादा आदर्श होते. नुसतं स्वप्न पाहत बसायचे नाहीत, तर ते स्वप्न सत्यात उतरायचे. इतका मोठा आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओ उभारणारा आमचा दादा असा अचानक का सोडून गेला, हे आम्हा सगळ्यांना कोडं आहे. मला विश्वासच बसत नाही, की ते असं काहीतरी करतील. आणि त्याच्यामागची काय कारणं आहेत, खरंच मला माहित नाही. पण जसं बालगंधर्वांच्या वेळी त्यांनी म्हटलं होतं, की असा बालगंधर्व होणे नाही. तसं मला आता म्हणावसं वाटतंय की, असा दिग्दर्शक होणे नाही.”

हे देखील वाचा – Nitin Desai Funeral : …अन् वडिलांना पाहून लेकीच्या अश्रूंचा बांध फुटला, डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ समोर

कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी रवी जाधव यांना त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटसाठी एनडी स्टुडिओमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्याबद्दल बोलताना रवी जाधव म्हणाले, “दोन-तीन महिन्यांपूर्वी त्यांनी मला फोन केला होता. की तू ‘बाल शिवाजी’ सिनेमा करतोयस, तेव्हा तू दुसरं कुठं जायचं नाही, एनडी स्टुडिओमध्ये यायचं. तुला या चित्रपटासाठी हवी ती मदत, हवी ती गोष्ट तुला मी देईन.” नितीन देसाई यांनी निर्मिती केलेल्या ‘बालगंधर्व’ चित्रपटाचे दिग्दर्शन रवि जाधव यांनी केले होते. ज्यात अभिनेता सुबोध भावेने बालगंधर्वची साकारली होती. (Director Ravi Jadhav on Nitin Desai Demised)

पाहा व्हिडिओ

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

हे देखील वाचा – Kirit Somaiya on Nitin Desai: “खूप वाईट वाटतं कारण…” नितीन देसाईंच्या अंतिम दर्शनासाठी गेलेल्या किरीट सोमय्यांना दुःख अनावर, म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी…”

Tags: nitin desaiNitin Desai Funeralnitin desai nd studioravi jadhav
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Sudhir salvi on nitin desai

Sudhir salvi on nitin desai : लालबागच्या राजासाठी नितीन देसाईंनी पाहिलेलं ‘ते’ स्वप्न राहिलं अपूर्ण, ७० ते ८० टक्के काम पूर्णही झालं होतं पण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.