कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली आहे. उत्तम कलादिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माते म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत उत्तम कामगिरी केली आहे. नितीन देसाई हे गणरायाचे निस्सीम भक्त होते. मुंबईच्या लालबागच्या राजाच्या स्टेजचे गेली १५ वर्षे ते काम पाहत होते. मुंबईच आद्य दैवत मानल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाच्या यंदाच्या ९० व्या वर्षी राजाचा मंडप सजवण्याचं काम आणि इतर दृश्य सजावटीचं काम नितीन देसाई करणार होते. (Sudhir salvi on nitin desai)
नितीन देसाई यांनी लालबागच्या राज्याच्या सजावटीचा श्री गणेशा करतानाचे काही फोटो इंस्टाग्राम वरून शेअर केले होते. आज कर्जत येथील एनडी स्टुडिओ येथे नितीन देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, यावेळी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी देखील हजेरी लावली आणि नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.
पाहा सुधीर साळवी नेमकं काय म्हणाले (Nitin Desai Funeral)
नितीन देसाई यांच्या अंतिम दर्शनाला सुधीर साळवी उपस्थित होते, यावेळी बोलताना ते म्हणाले, “जुलैला दादांनी मंडप पूजन करून कामाला सुरुवात केली होती, आणि अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना कानावर आली. दोन दिवसांपूर्वीच म्हणजे रविवारी नितीन दादा लालबागच्या राजाच्या स्टेजवर आले. त्यांची संपूर्ण टीम त्यांच्यासोबत त्यावेळी उपस्थित होती. तसेच लालबागच्या राजाचीही टीम तेथे होती. अंतिम टप्प्यावर सर्व काम सुरु झालं होतं. यावर्षी अनायसे दादांचा आवडता विषय श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि अनायसे ३५०वा राज्याभिषेक सोहळा यांचं औचित्य साधत लालबागच्या राजाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याचं ठरवण्यात आलं होतं.”
हे देखील वाचा – Kirit Somaiya on Nitin Desai: “खूप वाईट वाटतं कारण…” नितीन देसाईंच्या अंतिम दर्शनासाठी गेलेल्या किरीट सोमय्यांना दुःख अनावर, म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी…”
“एक सोहळा तिथे करायचा आमचा मानस होता. दादांनी “या वर्षी वेगळ्या पद्धतीने करू”, असं सांगितलं होतं, आणि रविवारी संध्याकाळपर्यंत थांबून त्यांनी जवळजवळ ७० ते ८० टक्के स्टेजच काम पूर्ण केलं. आणि सांगयला वाईट वाटतंय की, आमची पुढची मिटिंग गुरुवारी ठरली होती. त्यात ही अतिशय दुर्दैवी बातमी कानावर आली. लालबागच्या राजाच मुख्य प्रवेशद्वार आणि स्टेज सजावट करणं, हे नितीन चंद्रकांत देसाई २००८ पासून साकारत होते, तब्बल १५ वर्ष ते लालबागच्या राजाच्या परिवाराचे सदस्य होते. त्यामुळे जिथे मुख्य प्रवेशद्वार बनेल तिथे दादांना नक्कीच आदरांजली मंडळाकडून वाहण्यात येईल.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आमच्यासाठी ही दु:खद आणि धक्कादायक बातमी आहे. ते रविवारी आमच्यासोबत जवळपास दोन तास त्यांच्या टीमसह पंडालच्या कामावर लक्ष ठेवून होते. असे काही घडू शकते याचा कोणताही मागमूस नव्हता. देसाई हे लालबागच्या राजाचे भक्त होते आणि ते 2009 पासून आमच्याशी जोडले गेले. कदाचित एक वर्ष त्यांची तब्येत खराब असताना त्यांनी पंडालची रचना केली नसावी अन्यथा ते नंतर आमच्यासोबत होते. यावर्षी ही त्यांनी नेहमीप्रमाणे वेळेवर काम पूर्ण केले आणि त्याचे सर्वांनी कौतुक देखील केले. त्यामुळे त्याची आत्महत्या अत्यंत धक्कादायक बातमी आहे.