काळ कधी कोणाचा घात करेल सांगता येत नाही. असाच काहीसा प्रसंग बांग्लादेशीय अभिनेत्री निशत अरा अलविदा हिच्याबाबतीत घडला. निशतने अवघ्या १९ वर्षी आपला जीव गमावला. मृत्यूचं कारण ठरला तो म्हणजे तिला आलेला शुल्लक ताप. याबद्दल सविस्तर माहिती तिचा मित्र मोहम्मद ह्रदोय याने दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने सांगतलं की, निशतला ४ दिवसांपूर्वी डेंग्यूचा ताप आला होता. पण वेळेत मिळालेल्या उपचारांमुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. पण त्यानंतर तिने स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. (Bangladesh actress dies at age 19)
निशतचा मित्र मोहम्मद हा शेवटच्या दिवसांत तिच्या संपर्कात होता. मीडिया रिपोर्टनुसार, तिच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानंतर तिला तात्काळ प्राथमिक उपचारांसाठी रुग्णालयात नेलं होतं. मात्र तरीही तिच्या प्लेटलेटच्या पातळीत झपाट्याने घट होत गेली. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर एका दिवसातच या पातळीत वाढही दिसून आली. तिची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिला डिस्चार्ज दिला गेला होता. ह्रदोयच्या म्हणण्यानुसार, तिने या तापाकडे पुर्णपणे दुर्लक्ष केलं. तिला असं वाटत होतं की औषधांनी तिच्या प्रकृतीत सुधारणा होईल पण काळाने तिचा घात केला.
वाचा – काय होती निशतची शेवटची पोस्ट?(Bangladesh actress dies at age 19)

तिच्या मृत्युची बातमी कळताच सगळ्यांना धक्का बसला. इतक्या लहान वयात तिचा झालेला मृत्यू सगळ्यांसाठीच आश्चर्यकारक होता. निशत शेवटच्या श्वासापर्यंत सोशल मीडियावर सक्रिय होती. तिने शेवटच्या क्षणीदेखील फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यात तिने लिहीलं की, ‘माझ्या पुढच्या जन्मी मी पक्षी म्हणून जन्म घेईन’. निशतची ही पोस्ट बरीच व्हायरल होत आहे. दरम्यान निशतने आपला रुग्णालायातील बेडवरून एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिच्या उजव्या हाताला सलाईन लावण्यात आलं होतं.
आणखी वाचा – ‘रात्रीस खेळ चाले’च्या शेवंताने घेतलं नवं घर, सोशल मीडियावर पूजा करतानाचे फोटो व्हायरल
निशत सध्या उच्च माध्यमिक शिक्षण घेत होती. तिला खूप शिकायचं होतं. तिला खूप मोठी अभिनेत्री म्हणून नाव कमवायचं होतं. तिला थिएटरची बरीच आवड होती. तिला त्याच्यात पुढे करिअर करायचं होतं.