शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नृत्यांगणा गौतमी पाटीलवर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांचे निधन, पुण्यात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 5, 2023 | 9:07 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Gautami Patil Father Death

नृत्यांगना गौतमी पाटीलवर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांचे निधन, पुण्यात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

आजवर सर्व प्रेक्षकांना आपल्या नृत्यकलेवर ठेका धरायला लावणारी नृत्यांगणा गौतमी पाटील ही कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिली. मात्र आता गौतमी पाटील आणि तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. गौतमी पाटील हिच्या वडिलांचं निधन झालं असल्याची बातमी समोर आली आहे. चार दिवसांपूर्वीच गौतमी पाटील हिचे वडील रवींद्र पाटील हे धुळे येथील सूरत हायवेवर बेवारस अवस्थेत आढळले होते. त्यांनतर धुळे येथील एका शासकीय रुग्णालयात त्यांना उपचारासाठी नेण्यात आले होते. नंतर गौतमीने आपल्या वडिलांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचं काल निधन झालं. (Gautami Patil Father Death)

रवींद्र पाटील यांचे बेवारस अवस्थेतील फोटो सर्वत्र व्हायरल झाले होते. त्यानंतर गौतमीने आपल्या वडिलांची जबाबदारी स्वीकारली आणि वडिलांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण उपचारादरम्यान त्यांचं काल निधन झालं. रवींद्र पाटील यांना धुळ्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी धुळ्यातील रुग्णालयात दाखल केलं होतं.

आणखी वाचा – मराठी मालिकेमधून काढून टाकण्यामागचं सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितलं कारण, खुलासा करत म्हणाली, “आजारी असल्यामुळे त्यांनी मला…”

रवींद्र पाटील यांची धुळ्यात प्रकृती जास्त खालावली होती. त्यामुळे गौतमीने त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात हलवलं. याबाबत गौतमीने व्हिडीओ शेअर करत आपण माणुसकी म्हणून आपल्या वडिलांच्या उपचाराची जबाबदारी घेतल्याचं सांगितलं होतं.

आणखी वाचा – “पुन्हा सांगतो लक्षात घे” किरण मानेंची फेसबुक पोस्ट चर्चेत, म्हणाले, “एका फटक्यात भानावर…”

रवींद्र पाटील यांना दारुचं व्यसन होतं. या व्यसनामुळेच गौतमीची आई तिला पुण्यात घेऊन आली, कालांतारने पुण्यात लहानाच्या मोठ्या झालेल्या गौतमीने डान्स क्लासही लावला. तसेच ऑर्केस्ट्रामध्ये ती काम करू लागली. गौतमीच्या आयुष्यात अनेक चढउतार आले आणि त्यांचा सामान करत अखेर गौतमीने प्रसिद्धीचं शिखर गाठलं. नृत्यांगणा बरोबरच गौतमी एक अभिनेत्री म्हणूनही प्रेक्षकांच्या भेटीस आली. गौतमीने एका चित्रपटातही काम केलं आहे. गौतमीच्या वडिलांच्या निधनाच्या बातमीने गौतमीच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. गौतमीचं आज पित्याचं छत्र हरपलं आहे.

Tags: entertainmentgautami patilgautami patil fathergautami patil father death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Meera Joshi New Serial

'या' लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री मीरा जोशीची एंट्री, शरद पोंक्षेंसह करणार काम, म्हणाली, "तब्बल पाच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.