मराठी मनोरंजन क्षेत्रातील बऱ्याच कलाकारांनी स्वतःच्या हक्काची घरं घेत आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटतं पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. बऱ्याच अभिनेत्रींनी स्वतःचं घर घेत हे स्वप्न पूर्ण केलं आहे. या यादीत अभिनेत्री प्राजक्ता माळी, राधा सागर, ऋतुजा बागवे, सई ताम्हणकर, मीरा जोशी यांची नाव तर आहेतच पण यांच्या पाठोपाठ आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीने आपलं नाव जोडलं आहे. ती अभिनेत्री म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत शेवंताची भूमिका साकारलेली कृतिका तुळसकर. (Krutika tulaskar buy new house)
मुंबईत येऊन संघर्ष करत स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं सोपी नसतं. अशा परिस्थितीत आपली वेगळी ओळख निर्माण करत कृतिकाने हे यश मिळवलं आहे. मुंबईत पेईंग गेस्ट म्हणून सुरुवात करत तिने आज स्वतःच्या मालकीचं घर घेतलं .तिने गोरेगावमध्ये हे नवं कोरं घर घेतलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही बातमी चाहत्यांना दिली.
वाचा – कृतिकाने फोटोला काय दिलं कॅप्शन?(Krutika tulaskar buy new house)
तिने नवीन घराच्या वास्तूशांतीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत कृतिका तिच्या नवऱ्यासोबत पूजेला बसलेली दिसत आहे. ‘मुंबईत आल्यानंतर पेइंग गेस्ट ते भाड्याच घर ते स्वतःच घर यात खुप मोठा काळ होता. पुजेला बसल्यावर त्या सर्व प्रवासात एक नजर फिरवली तेव्हा वाटलं, बरच… काही शिकवणारा होता हा प्रवास. आता नवीन घर नवीन जबाबदारी आणि खुप आनंद’, असं म्हणत फोटोला कॅप्शन दिलं आहे.
तिने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. तिच्या इथपर्यंतच्या प्रवासाच्या यशाचंही बऱ्याच जणांनी कौतुक केलं आहे. कृतिकाला ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे विशेष ओळख मिळाली. तिने साकारलेली सुश्माची भूमिका बरीच गाजली. त्यात तिने साकारलेलं लूक प्रेक्षकांना खूप आवडलं. तिने मालिकांबरोबरच चित्रपटातही काम केलं आहे. ‘पाशबंध’, ‘बबन’ त्याचबरोबर ‘विजेता’ चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.