बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या हार्ट अटॅकची बातमी खोटी; कुटुंबीयांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले…

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 25, 2026 | 4:20 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bollywood Director Heart Attack Fake News

सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या हार्ट अटॅकची बातमी खोटी

Bollywood Director Heart Attack Fake News : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांच्याबाबत अलीकडेच एक धक्कादायक अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरली. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची आणि वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याची चर्चा रंगली होती. इतकेच नव्हे तर त्यांना कोकिलाबेन हॉस्पिटल येथे तातडीने दाखल करण्यात आल्याचेही म्हटले जात होते. मात्र, या सर्व बातम्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट शब्दांत फेटाळले आहे.

कुटुंबाच्या वतीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेयर करण्यात आले. त्यात नमूद केले आहे की, भंसाली पूर्णपणे ठणठणीत आहेत आणि त्यांची केवळ नियमित वैद्यकीय तपासणी (रूटीन मेडिकल चेकअप) झाली होती. घाबरण्यासारखे काहीही कारण नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. चाहत्यांकडून व्यक्त होत असलेल्या प्रेमाबद्दल आणि काळजीबद्दल कुटुंबाने आभारही मानले आहेत. २४ फेब्रुवारी रोजी भंसाली यांनी आपला ६३वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान अचानक तब्येत बिघडल्याची आणि त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आल्याची बातमी काही माध्यमांमध्ये झळकली.

आणखी वाचा – MTV Splitsvilla फेम स्पर्धकाचं निधन; वयाच्या ३७व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

मात्र, त्यांच्या जवळच्या सूत्रांनी या वृत्ताला पूर्णपणे चुकीचे ठरवले. रुग्णालयात दाखल केल्याच्या बातम्या खोट्या असून, केवळ नियमित तपासणीसाठी भेट दिली होती, असे स्पष्ट करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याबाबत विचारणा केल्यावरही अशा कोणत्याही घटनेला त्यांनी प्राधान्य दिले नाही. सध्या भंसाली पूर्णपणे निरोगी असून आपल्या कामात व्यस्त असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चाहत्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता माहितीवरच विश्वास ठेवावा, असे सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा – “मला हात लावू नको” राखीने दिली विशालला चेतावणी; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात तुफान राडा

Tags: Bollywood Director Heart Attack Fake Newsbollywood news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
vijay patwardhan

"मालिकेत माझेही पैसे बुडवले…", थकबाकी प्रकरणावर मराठी अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, "मी पोस्ट केली…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.