गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मालिकेत माझेही पैसे बुडवले…”, थकबाकी प्रकरणावर मराठी अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “मी पोस्ट केली…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 25, 2026 | 5:49 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
vijay patwardhan

"मालिकेत माझेही पैसे बुडवले...", थकबाकी प्रकरणावर मराठी अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, "मी पोस्ट केली..."

vijay patwardhan : मालिकेतील कलाकारांनी आपल्या कामाचा मोबदला मिळाला नाही म्हणून अनेकदा आवाज उठविला. अनेक असे मराठी कलाकार आहेत ज्यांना अनेक वर्ष काम करुनही त्यांना त्यांचे मानधन मिळाले नाही. हा पैसे थकबाकीचा मुद्दा कलाकारांना काही नवीन नाही. काही दिवसांपूर्वीच अभिनेता शशांक केतकरने हे मन बावरे मालिकेत काम केल्याचे पैसे न मिळाल्यावरुन आवाज उठविला. मालिका प्रचंड गाजली पण नंतर ती संपताच काही काळाने त्याबाबतचे वाद देखील समोर आले. मग हळू हळू आणखी काही कलाकार यावर व्यक्त झाले. त्यांनतर मानधन न दिल्याचा आरोप याच मालिकेत काम करणाऱ्या विजय पटवर्धन यांनी केला. या थकबाकी प्रकरणावर आता त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

विजय पटवर्धन यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी इंडस्ट्रीतील अनेक गोष्टींबाबत खुलेआमपणे भाष्य केलं. यावेळी बोलताना विजय यांनी त्यांच्या थकलेल्या रकमेवर भाष्य केलं. विजय म्हणाले, “पैसे बुडवण्याचे प्रकार वेगळे नाहीत जसे इतर ठिकाणी बुडतात त्याच पद्धतीने बुडवतात. फक्त इकडे तीन महिन्यानंतर पेमेंट केलं जातं. मालिकांसाठी वगैरे तर काही वेळेला ते तीन महिन्यांचे चार महिने होतात, मग कधी पाच महिने होतात, सहा महिने होतात आणि मग मालिका संपते”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या हार्ट अटॅकची बातमी खोटी; कुटुंबीयांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले…

पुढे त्यांनी म्हटलं, “अशा वेळेला आणि मग प्रोड्युसर्स म्हणतात की, आता मालिका संपली. आता पैसे नाहीत. मी पोस्ट केली होती ते अजूनही अनेक मोठ्या कलाकारांची पोस्ट गाजते आहे. आणि ते बरोबर आहे. त्यांच म्हणजे त्याच्यात काही चूक नाहीये. मीही त्यांच्या लायनीतलाच आहे. त्याचे जर का जास्त राहिले असतील तर त्यापेक्षा थोडेसे कमी माझे पण राहिले आहेत”.

Tags: entertainmentmarathi actorvijay patwardhan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Rohan Gujar Post

कुणी तरी येणार येणार गं…; लोकप्रिय मराठी अभिनेता लग्नाच्या आठ वर्षांनी होणार बाबा, पत्नीचं थाटामाटात केलं डोहाळ जेवण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.