बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

MTV Splitsvilla फेम स्पर्धकाचं निधन; वयाच्या ३७व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 25, 2026 | 2:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mayank Pawar Death

MTV Splitsvilla फेम स्पर्धकाचं निधन

Mayank Pawar Death : रिअॅलिटी शो आणि फिटनेस क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. MTV Splitsvilla या लोकप्रिय रिअॅलिटी शोमधील स्पर्धक मयंक पवार यांचे वयाच्या अवघ्या ३७व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती शेअर करण्यात आली असून, या बातमीने चाहते आणि फिटनेस क्षेत्रातील अनेकांना मोठा धक्का बसला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये भावनिक शब्दांत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. “एक भाऊ, एक चॅम्पियन, एक मार्गदर्शक आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान… मयंक पवार कायम आपल्या हृदयात राहील,” असे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मयंक केवळ रिअॅलिटी शोमुळे ओळखला जात नव्हता, तर त्याने फिटनेस क्षेत्रातही आपली वेगळी छाप पाडली होती. सात वेळा ‘मिस्टर इंडिया’ किताब जिंकत त्याने आपली मेहनत आणि शिस्त सिद्ध केली होती. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर म्हणून त्याने अनेकांना आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळवले. सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि चाहत्यांनी दु:ख व्यक्त केले. अनेकांनी त्यांच्या साधेपणाचा आणि सकारात्मक स्वभावाचा उल्लेख करत श्रद्धांजली वाहिली. एका चाहत्याने लिहिले की, काही दिवसांपूर्वीच त्याने शोमधील मयंकचा प्रवास पुन्हा पाहिला होता आणि आज ही बातमी ऐकून विश्वास बसत नाही. MTV Splitsvilla च्या सातव्या सिझनमध्ये मयंकची लोकप्रियता लक्षणीय होती.

आणखी वाचा – “मला हात लावू नको” राखीने दिली विशालला चेतावणी; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात तुफान राडा

View this post on Instagram

A post shared by Mayank Pawar™ (@pawarmayank)

शोमधून त्याला बाहेर पडावे लागले तेव्हा सूत्रसंचालिका Sunny Leone सुद्धा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. तो क्षण प्रेक्षकांसाठीही अतिशय हृदयस्पर्शी ठरला होता. मयंकच्या अकाली जाण्यामुळे त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत चर्चा सुरू आहेत. मात्र अधिकृतरीत्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यांच्या निधनामुळे केवळ कुटुंबीय आणि मित्रपरिवारच नव्हे, तर संपूर्ण फिटनेस विश्वावर शोककळा पसरली आहे. त्याच्या कार्याची आणि प्रेरणादायी प्रवासाची आठवण चाहत्यांच्या मनात कायम राहील.

आणखी वाचा – ‘Bigg Boss’च्या घरात असताना दीपाली सय्यदच्या सासूबाईंचं निधन, दुःखद बातमी लपवून ठेवली कारण…; सूत्र म्हणाले…

Tags: bollywood newsMayank Pawar Death
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Bollywood Director Heart Attack Fake News

सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या हार्ट अटॅकची बातमी खोटी; कुटुंबीयांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.