बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला हात लावू नको” राखीने दिली विशालला चेतावणी; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात तुफान राडा

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 25, 2026 | 1:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6

राखीने दिली विशालला चेतावणी

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस’ मराठी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? भांडणं, वाद, एकमेकांवर कुरघोडी, स्ट्रॅटेजी आणि तुफान ड्रामा! पण यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात काहीतरी अगदी वेगळंच पाहायला मिळालं. घरात चक्क शाळाच भरली आणि सगळे सदस्य विद्यार्थी बनले. शाळेचा युनिफॉर्म घालून स्पर्धक एकदम शाळकरी मुलांसारखे तयार झालेले दिसत होते. कुणी मस्ती करत होतं, कुणी एकमेकांची खिल्ली उडवत होतं, तर कुणी टास्कसाठी आधीपासूनच प्लॅनिंग करत होतं. वातावरण जरी मजेशीर असलं तरी टास्क सुरू होताच सगळं चित्र बदललं.

या टास्कदरम्यान तन्वी बॉल घेऊन पळताना दिसते. त्यावेळी रुचिता आणि अनुश्री तिच्याकडून बॉल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. परिस्थिती तापू लागते आणि त्याच वेळी राखी तन्वीच्या मदतीला धावून येते. पण इथेच खेळाला वेगळं वळण मिळतं. विशाल थेट राखीला उचलून बाजूला करतो, जे राखीला अजिबात पसंत पडत नाही. विशालच्या या कृतीमुळे राखी संतापते. ती स्पष्ट शब्दांत त्याला वॉर्निंग देते “मी तुला शेवटचं सांगते, मला हात लावायचा नाही!” तिच्या या वक्तव्यामुळे घरातील वातावरण आणखी बदलतं. इतर सदस्यही हा सगळा प्रकार पाहून हैराण झालेले दिसतात.

आणखी वाचा – ‘Bigg Boss’च्या घरात असताना दीपाली सय्यदच्या सासूबाईंचं निधन, दुःखद बातमी लपवून ठेवली कारण…; सूत्र म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आता, या घटनेवरून विशाल आणि राखीमध्ये आणखी मोठा वाद रंगणार का? ‘बिग बॉस’ यावर काही कारवाई करणार का? की हा वाद पुढच्या काही दिवसांत आणखी पेटणार? अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये दिसून येत आहे.

आणखी वाचा – घटस्फोटाच्या काही महिन्यांत पतीचं निधन, लेकीचा एकटीने सांभाळ आणि…; ‘भाभीजी घर…’ फेम अभिनेत्रीचा कठीण काळ, म्हणाली, “नवऱ्याचं जाणं…”

Tags: Bigg Boss Marathi 6entertainment newsmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Mayank Pawar Death

MTV Splitsvilla फेम स्पर्धकाचं निधन; वयाच्या ३७व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.