मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी आजवर अनेक मालिका केल्या आहेत. पण काही वर्षांपूर्वी वर्षा यांचा भीषण अपघात झाला, त्यावेळेस त्यांना गंभीर दुखापत झाली होती. मात्र, या गंभीर दुखापतीतून सावरत त्यांनी मालिकाविश्वात दमदार कमबॅक केले. सध्या त्या झी मराठी वाहिनीवरील ‘नवा गडी नवा राज्य’ या मालिकेत सुलक्षणाची भूमिका साकारताना दिसत आहे. त्या ऑनस्क्रीन जितक्या उत्साही असतात, तितक्याच त्या ऑफस्क्रिन धमाल करताना दिसतात. त्याचबरोबर सोशल मीडियाद्वारे त्या नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अशात वर्षा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, जी जोरदार व्हायरल होत आहे. (Varsha Dandale dance with Madhuri Dixit)
झी मराठी वाहिनीचा ‘झी मराठी अवॉर्ड’ सोहळा नुकताच पार पडला. ज्यामध्ये वर्षा दांदळेंसह अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. या सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनीदेखील हजेरी लावली होती. यावेळी वर्षा यांना माधुरी दीक्षित यांच्यासह त्यांच्या प्रसिद्ध गाण्यावर थिरकण्याचा योग आला. या व्हिडीओला त्यांनी “ती आली, तिने पाहिलं, तिने जिंकलं. साक्षात माधुरी दीक्षितबरोबर नृत्य करणे म्हणजे दुधात साखर…” असं कॅप्शन दिली आहे.
हे देखील वाचा – नागराज मंजुळेंच्या ‘नाळ २’ चित्रपटाचा नवा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
वर्षा यांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्यांच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सद्वारे कौतुक केले आहे. एक चाहता यावर म्हणाल्या, “खूप छान अनुभव असणार, आनंददायी.” तर आणखी एका चाहतीने “खूप मज्जा केलेली दिसते.” अशी कमेंट करत हा कार्यक्रम छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.
हे देखील वाचा – कर्जबाजारी झालो, घरात जेवण-लाईट नाही अन्…; तेजस्विनी पंडितला सत्य परिस्थिती सांगताना कोसळलं होतं रडू, म्हणालेली, “लोकांच्या नजरा…”
वर्षा यांच्या ‘नांदा सौख्य भरे’, ‘पाहिले न मी तुला’, नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. त्यापैकी ‘नांदा सौख्य भरे’ मालिकेत साकारलेली ‘वच्छी आत्या’ ही भूमिका प्रचंड गाजली होती. शिवाय, ‘नावाची वच्छी नाही’ हा डायलॉग विशेष पसंतीस उतरला होता. त्याचबरोबर, त्यांनी अनेक चित्रपट व ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुद्धा काम केलं आहे. वर्षा दांदळे सोशल मीडियावर सक्रिय असून विविध व्हिडीओज व फोटोजच्या माध्यमातून त्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी नाशिकमध्ये फार्महाऊस बांधलं होतं, ज्याची बरीच चर्चा झाली होती.