‘झी मराठी’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. अशातच ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका काही दिवसांपासून चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकेने काही वर्षांचा लीप घेत ही मालिका प्रेक्षकांसमोर आली आहे. तेव्हापासुन ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. मालिकेत अप्पी व अर्जुन यांची ताटातूट झालेली पाहायला मिळत आहे. त्यानंतर सात वर्षांनी आता हे दोघेही एकमेकांच्या समोर आल्याचं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. तर एकीकडे अमोल आता मोठा झाला असून बालकलाकार साईराज केंद्रे ही भूमिका साकारताना दिसत आहे. (Appi Amachi Collector Promo)
तब्ब्ल सात वर्षांनी अर्जुन व अप्पी समोरासमोर येतात. अप्पीची बदली उत्तराखंडहुन पुण्यात झालेली असते. तेव्हा अप्पी अमोलला घेऊन पुण्यात तिच्या बाबांकडे येते. ड्युटीवर जॉईन व्हायला काही वेळ असतो म्हणून ती अमोलला गड-किल्ल्यांची सफर घडवायचं ठरवते. अमोलही पुण्यात आल्यावर खूप खुश असतो. एकीकडे त्याला असं वाटत असतं की त्याचा बाबा हा पुण्यात हरवलेला असतो. त्यामुळे आता पुण्यात आल्यावर तो व त्याची माँ त्याच्या बाबाला शोधतील असं त्याला वाटत असतं. त्यामुळे अर्जुन खूप खुश असतो. आणि तो त्याच्या माँबरोबर गड किल्ले फिरायला निघतो.
अशातच मालिकेच्या समोर आलेल्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा प्रोमो मालिकेच्या कथानकाला कलाटणी देणारा आहे. मालिकेच्या या नव्या प्रोमोमध्ये अप्पी व अर्जुन यांची भेट होताना पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये असं पहायला मिळत आहे की, अमोल व अप्पी फिरायला जातात तेव्हा अमोलची टोपी खाल पडते. ती आणायला अप्पी खाली येते. टोपी उचलल्यानंतर अप्पीचा तोल जातो आणि ती खाली पडणार तेव्हा अर्जुन तिला पकडतो आणि तिला आधार देतो. तब्बल सात वर्षांनी अप्पी व अर्जुन यांची भेट झाली आहे.
अप्पीला पाहून अर्जुन म्हणतो, “अपर्णा तू इकडे?”, यावर अप्पी म्हणते, “अप्पी नाही म्हणू वाटलं का तुला?”, यावर अर्जुन म्हणतो, “आपल्यात एवढी जवळीक नाही राहिली”. यानंतर अर्जुन म्हणतो, अमोल कुठे आहे, मला त्याला भेटायचं आहे”. यावर अप्पी रागात म्हणते, “त्याला जन्माला घातलंस म्हणून तू त्याच्यावर हक्क नाही दाखवू शकत”. यावर अर्जुन तिला विचारतो, “तू मला अमोलबद्दल सांगणार आहेस की नाही?”, यावर नाही असं म्हणत अप्पी तिथून निघून जाते. त्यानंतर अर्जुन रागात अप्पे असा आवाज देऊन अप्पीला थांबायला लावतो.