प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची निर्मिती असलेल्या ‘नाळ भाग २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २०१८ मध्ये आलेल्या ‘नाळ’ या चित्रपटाच्या प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. तसेच, चित्रपटाने अनेक राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहे. चित्रपटातील गाणी, कथा, संवाद या सर्व गोष्टींचे कौतुक झाले. त्याचबरोबर, लहानग्या ‘चैतू’चे बोबडे बोल प्रेक्षकांना भावले होते. आता या सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भाग येत असून ज्यामध्ये सर्वांचा लाडका चैतू आता मोठा झाल्याचं पाहायला मिळणार आहे. (Naal 2 new Teaser out)
काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा पहिला टीझर समोर आला होता. ज्यात मोठ्या चैतूची झलक पाहायला मिळाली होती. कालच या चित्रपटाचं पहिलं गाणं ‘भिंगोरी’ प्रदर्शित झालं होतं. आता या चित्रपटाचं नवं टीझर नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये मोठा चैतू आणि त्याच्या खऱ्या आईचं हे प्रेमळ नातं दिसून येत आहे. चित्रपटाच्या पहिल्या टीझरप्रमाणेच या नव्या टीझरमध्येही पहिल्या भागाची झलक दाखवण्यात आली आहे. चैतूची खरी आई जेव्हा गाव सोडून जाते, तेव्हा लहान चैतू तिला छत्री देताना यात दिसते. त्यानंतर मोठा झालेला चैतू त्याच्या आईला सायकलवर बसायला सांगतो. तेव्हा ती त्या सायकलवर बसते, आणि मोठ्या चैतूसह बाजारात जात असल्याचे या टीझरमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. यावेळी मोठा चैतू आणि त्याच्या आईच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो.
हे देखील वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे राहुल द्रविड यांची पुतणी, सामन्यानंतर घेतली भेट, फोटो व्हायरल
चित्रपटाच्या या नवा टीझरला पहिल्या टीझरप्रमाणेच पसंती मिळत असून या टीझरवर नेटकरी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहे. पहिल्या भागात चैतूची भूमिका साकारणारा श्रीनिवास पोकळे या भागातही दिसणार आहे. तर अभिनेत्री दीप्ती देवी चैतूच्या खऱ्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार हेदेखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
हे देखील वाचा – कर्जबाजारी झालो, घरात जेवण-लाईट नाही अन्…; तेजस्विनी पंडितला सत्य परिस्थिती सांगताना कोसळलं होतं रडू, म्हणालेली, “लोकांच्या नजरा…”
‘नाळ’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये प्रेक्षकांना छोट्या चैतूची निरागसता आपल्याला पाहायला मिळाली होती. जिथून या चित्रपटाचा शेवट झाला होता, तिथून या कथेला सुरुवात होणार आहे. यात मोठा झालेला चैतू त्याच्या खऱ्या आईला भेटण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात येतो. चैतू आणि त्याच्या खऱ्या आईची भेट होणार का? याची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागली आहे. नागराज मंजुळे यांच्या आटपाट प्रोडक्शन्स व झी स्टुडिओज निर्मित व सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर येत्या १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.